Women's Reservation Bill approved in Rajya Sabha, PM narendra modi decision welcomed by CM eknath Shinde  Saam TV
मुंबई/पुणे

Women's Reservation Bill: नारीशक्ती विधेयक राज्यसभेत मंजूर, PM मोदींच्या निर्णयाचं CM शिंदेंकडून स्वागत

Women's Reservation Bill News: लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे “नारीशक्ती वंदन अधिनियम” हे १२८ वे घटनादुरुस्थी विधेयक आता राज्यसभेतही मंजूर झाले आहे.

Satish Daud

Women's Reservation Bill News

लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे “नारीशक्ती वंदन अधिनियम” हे १२८ वे घटनादुरुस्थी विधेयक आता राज्यसभेतही मंजूर झाले आहे. राज्यसभेत जवळपास सर्वच विरोधी पक्षांनी विधेयकाला समर्थन दिले. संसदेच्या दोन्ही सभागृहात हे विधेयक मंजूर झाल्याने याचे कायद्यात रूपांतर झाले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या निर्णयाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केलं.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महिलांना आरक्षण देणारे नारीशक्ती विधेयक सर्वसंमतीने राज्यसभेत मंजूर झाले. हा क्षण महिलांसाठी गौरवाचा क्षण असून देशाच्या इतिहासात सुवर्णक्षराने लिहीला जाणार आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विधेयकाचे स्वागत केले.  (Latest Marathi News)

"आज महिला विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवत आहे. या कायद्यामुळे त्यांना राजकीय क्षेत्रात नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे. हा निर्णय देशासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री मोदीजींच्या दूरदृष्टी आणि धाडसी निर्णय क्षमतेमुळे हा निर्णय होऊ शकला आहे, असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी (CM Eknath Shinde) पंतप्रधान मोदींचे आभार मानले.

आमच्या शासनाने ही प्रधानमंत्री मोदीजींच्या प्रेरणेतून नमो महिला सक्षमीकरण अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महिलांना विविध शासकीय योजनांचे लाभ दिले जाणार आहेत, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. दरम्यान, मंगळवारी लोकसभेत विधेयक मंजूर झाल्यानंतर गुरुवारी राज्यसभेत विधेयकावर दीर्घ चर्चा झाली.

त्यानंतर या विधेयकावर राज्यसभेत मतदान घेण्यात आलं. महिला विधेयकाच्या बाजूने २१५ तर विरोधात शून्य मतं पडली. त्यामुळे हे विधेयक मंजूर झाले आहे. मंजुरीनंतर विधेयक आता राष्ट्रपतींकडे पाठविले जाणार आहे. राष्ट्रपतींच्या अंतिम स्वाक्षरीनंतर लोकसभा आणि विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारा कायदा अस्तित्वात येणार आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

SCROLL FOR NEXT