PMP Bus
PMP Bus  Saamtv
मुंबई/पुणे

PMPL News: पुण्यातील महिलांसाठी खुशखबर! दर महिन्याच्या 'या' तारखेला करता येणार मोफत प्रवास; पाहा कोणत्या मार्गावर धावणार बस..

Dnyaneshwar Choutmal

Womens Day 2023: जागतिक महिला दिन अवघ्या चार दिवसांवर येवून ठेपला आहे. याच निमित्ताने पीएमपीच्या गेल्या अनेक दिवसांपुर्वी बंद पडलेल्या ‘महिलादिनानिमित्त मोफत प्रवास’ हा उपक्रम आता पुन्हा सुरू करण्यात आला आहे. त्यानुसार महिलांना आता तेजस्विनी बसमध्ये दरमहिन्याच्या 8 तारखेला दिवसभर मोफत प्रवास करता येणार आहे. महिला दिनाचे औचित्य साधून ही खुशखबर देण्यात आली आहे. (Womens Day)

याबाबत अधिक माहिती अशी की, जागतिक महिला दिनानिमित्ताने मार्च २०१९मध्ये प्रत्येक महिन्याच्या आठ तारखेला तेजस्विनी बसमधून महिलांसाठी मोफत प्रवास सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला पीएमपी संचालक मंडळाची मान्यता मिळाली होती. त्यानुसार पीएमपीकडून (PMP) खास महिलांसाठी २३ मार्गांवर २८ तेजस्विनी बस सुरू करण्यात आल्या होत्या.

मात्र कोरोनाकाळात या बसला महिलांचा अल्प प्रतिसाद असल्याने तेजस्विनी बस बंद करण्यात आल्या होत्या. आता येत्या आठ मार्च म्हणजे जागतिक महिला दिनापासून पुन्हा प्रत्येक महिन्याच्या आठ तारखेला तेजस्विनी बसमधून महिलांसाठी मोफत प्रवास सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जास्तीत जास्त महिलांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपीकडून करण्यात आले आहे.

या मार्गांवर धावणार बस..

स्वारगेट ते येवलेवाडी, स्वारगेट ते हडपसर, अप्पा बळवंत चौक ते सांगवी, महापालिका भवन ते लोहगाव, कोथरूड डेपो ते विश्रांतवाडी, कात्रज ते महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, कात्रज ते कोथरूड डेपो, हडपसर ते वारजे माळवाडी, भेकाराईनगर ते महापालिका भवन, हडपसर ते वाघोली (केसनंद फाटा), अप्पर डेपो ते स्वारगेट, अप्पर डेपो ते पुणे स्टेशन, पुणे स्टेशन ते लोहगाव, महापालिका भवन ते आकुर्डी रेल्वे स्टेशन, निगडी ते पुणे स्टेशन (औंध मार्गे), निगडी ते भोसरी, निगडी ते हिंजवडी माण-फेज-३, चिंचवडगाव ते भोसरी आणि चिखली ते डांगे चौक. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dark Circles Removal : डोळ्यांवरील डार्कसर्कल १० मिनीटांत होतील गायब

Maharashtra Election: राज्यातील १३ जागांवर ठाकरे गटविरुद्ध शिवसेना,तर १५ जागेवर काँग्रेसची भाजपशी लढत

Chanakya Niti: यश प्राप्त करायचंय? चाणक्याची ही रणनिती लक्षात ठेवा

Amitabh Bachchan: कोस्टल रोड, अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट; भाजप अन् आदित्य ठाकरेंमध्ये रंगलं ट्विट वॉर

Investment Tips: गुंतवणूक करताना 'या' गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

SCROLL FOR NEXT