Women voters emerge as key decision-makers in Mumbai’s BMC elections Saam Tv
मुंबई/पुणे

बीएमसीतही लाडक्याच किंगमेकर ठरणार? लाडकीच्या हाती, पालिकेची चावी?

Mumbai Civic Polls: मुंबई महापालिकेची सत्ता कुणाकडे जाणार हे मतदार राणी ठरवण्याची शक्यता आहे... कारण मुंबईत महिला मतदार निर्णायक ठरणार आहेत.. ते नेमकं कसं ? आणि किती प्रभागात महिला मतदार पुरुषांपेक्षा जास्त आहेत?

Bharat Mohalkar

विधानसभा निवडणुकीप्रमाणेच आता मुंबईत महापालिकेत महिला मतदार किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे...कारण मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघापैकी तब्बल 24 मतदारसंघात महिलांचा मतदानाचा टक्का पुरुषांच्या तुलनेत वाढल्याचं समोर आलंय.

BMC कुणाची? लाडकी ठरवणार

मतदारसंघ टक्केवारी

कुलाबा- 5.15

धारावी- 2.79

चांदिवली 2.66

मानखुर्द 2.61

वरळी 2.51

अणुशक्तीनगर 2.5

सायन 1.88

वांद्रे 1.71

शिवडी 1.32

मागाठाणे 1.26

दिंडोशी 1.9

कुर्ला 1.04

मालाड 0.88

गोरेगाव 0.83

दहिसर 0.60

वर्सोवा 0.56

कलिना 0.54

अंधेरी पूर्व 0.51

भायखळा 0.47

कांदिवली 0.33

चारकोप 0.22

अंधेरी पश्चिम 0.27

विलेपार्ले 0.17

चेंबूर 0.5

खरंतर मुंबईत महिला मतदारांचा टक्का जास्त असल्याचं समोर आल्यानंच सर्वच पक्षांनी आपला जाहीरनामा महिला केंद्रित केलाय.. ठाकरे बंधूंनी तर घरकाम करणाऱ्या महिलांसाठी दीड हजार रुपयांसोबतच कोळी महिलांसाठीही विशेष योजनांची घोषणा केलीय...

दुसरीकडे महायुतीनंही मुंबईतील लाडक्या बहिणींसाठी बेस्टमध्ये तिकीटात 50 टक्के सूट देण्यासोबतच, 5 लाख रुपयांचं बिनव्याजी कर्ज देण्याची घोषणा केलीय.. आता ही सगळी घोषणाबाजी सुरु असली तरी विधानसभा निवडणुकीनंतर लाडक्या बहीणींच्या अर्जांची छाननी केली. हे सुद्धा महिला मतदारांनी लक्षात ठेवलं पाहिजे. साम टीव्ही सावित्रीच्या लेंकीना आवाहन करत आहे की.... सदसदविवेकबुद्धीला जागून मतदान करा.... लोकशाही वाचवा नाहीतर भविष्यात धोक्यात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा; दोन गटात तुफान हाणामारी

के एल राहुलची शतकी खेळी व्यर्थ; न्यूझीलंडचा भारतावर मोठा विजय

मध्य रेल्वेचा विशेष पॉवरब्लॉक; अनेक लांबपल्ल्याच्या ट्रेनच्या मार्गात बदल, वाचा संपूर्ण वेळापत्रक

ऐन निवडणुकीत राज्यात पैशांचा पाऊस; निवडणूक अधिकाऱ्यांनी २ दिवसांत ९०००००० रुपयांची रोकड पकडली

होय मी बाजीरावच, फडणवीसांची टीका, दादांचं प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT