Khalapur, bailgada sharyat, wadval, women saam tv
मुंबई/पुणे

Bailgada Sharyat : बैलगाडा शर्यतीच्या अपघातात महिला ठार, आयाेजकांवर गुन्हा दाखल

या घटनेचा पाेलिस कसून तपास करीत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- सचिन कदम

Raigad News : रायगड (raigad) जिल्ह्यातील खालापुर (khalapur) तालुक्यात बैलगाडा शर्यतच्या (bailgada sharyat) दरम्यान एका महिलेचा (women) मृत्यू झाला आहे. या शर्यतीसाठी आयाेजकांनी परवानगी घेतली नसल्याची माहिती समाेर आली आहे. या प्रकरणी आयाेजकांवर पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (Breaking Marathi News)

खालापुर तालुक्यातील वडवळ येथे बैलगाडा शर्यतीचे आयाेजन करण्यात आले हाेते. या शर्यती दरम्यान झालेल्या अपघातात परिसरात कलिंगड विक्रीचा व्यवसाय करणा-या महिलेचा मृत्यू झाला. यामुळे मैदानात एकच खळबळ उडाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार अनिता बाळाराम गायकवाड (वय 58) (Anita Balaram Gaikwad) असे मृत महिलेचे नाव आहे. अनिता या बैलगाडी शर्यत परिसरात कलिंगड विक्रीचा व्यवसाय करीत हाेत्या. त्यांच्या शर्यतीच्या परिसरात मृत्यू झाला.

या शर्यतीसाठी आयाेजकांनी प्रशासनाची परवानगी घेतली नव्हती असे प्रथम दर्शनी आढळलं. त्यामुळे विना परवानगी बैलगाडा शर्यतीचे आयाेजन करणे तसेच अन्य गुन्ह्या (कलम 304 आणि कलम 188) बाबत केले होते आयोजन आयोजकांवर खालापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

घरामध्ये पैसा टिकावा आणि सुख-समृद्धी नांदावी यासाठी गणेशोत्सवात करा ‘हे’ 5 सोपे वास्तु उपाय!

Maharashtra News Live Update: दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Pune : पुण्यात वाहतुकीत मोठा बदल! 'या' महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक २ तास राहणार बंद; पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या

Dal Benefits : हृदय अन् मेंदूसाठी वरदान! रोज मूठभर खा 'ही' डाळ, ७ फायदे वाचून व्हाल थक्क

RuPay आणि UPI यूजर्ससाठी गुड न्यूज! ₹2,000 पर्यंतचे पेमेंट फ्री, नंतर चार्ज लागणार; सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT