Atal Setu Latest News Saam TV
मुंबई/पुणे

Atal Setu News : शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूनवरुन उडी घेत डॉक्टर महिलेची आत्महत्या; पोलिसांकडून शोध सुरु

Atal Setu latest News : महिला अटल सेतूवर येताच टॅक्सी चालकाला फोटो काढायचा आहे, असं सांगून टॅक्सी थांबवली. त्यानंतर टॅक्सीमधून उतरून महिलेने अटल सेतूवरून उडी मारून आत्महत्या केली.

साम टिव्ही ब्युरो

सिद्धेश म्हात्रे | नवी मुंबई

Navi Mumbai :

मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सागरी सेतूवरून ४३ वर्षीय महिलेने उडी घेत आत्महत्या केली आहे. मुंबईतील रहिवाशी असलेली माहिला डॉक्टर असल्याची माहिती समोर येत आहे. सदर महिला मुंबईहून टॅक्सीने अटल सेतूवर आली होती. किंजल शाह असं या महिलेचं नाव आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

किंजल यांनी अटल सेतूवर येताच टॅक्सी चालकाला फोटो काढायचा आहे, असं सांगून टॅक्सी थांबवली. त्यानंतर टॅक्सीमधून उतरून त्यांनी अटल सेतूवरून उडी मारून आत्महत्या केली. टॅक्सी चालकाने तात्काळ पोलिसांना याबाबत सूचना दिली. काही वेळातच पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. (Latest News)

किंजल यांचा शोध सुरू असून अद्याप त्यांचा मृतदेह मिळाला नाही. किंजल या आपल्या वृद्ध आई-वडिलांसोबत मुंबईत राहत होत्या. पेश्याने डॉक्टर असणाऱ्या किंजल मागील दहा वर्षांपासून डिप्रेशनमध्ये असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

किंजल या सोमवारपासून बेपत्ता असून भोईवाडा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार देण्यात आली आहे. किंजल शहा यांच्या घरी सापडलेली सुसाइड नोट पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यात त्यांनी अटल सेतूवरून उडी मारून आत्महत्या करत असल्याचे लिहिले होते.

पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता सोमवारी दुपारी १.४५ च्या सुमारास त्या टॅक्सीत बसताना दिसत आहेत. अटल सेतूवरील सीसीटीव्ही तपासले असता. किंजल शहा यांनी २ वाजून १४ वाजता अटल सेतूवरुन उडी मारल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. किंजल शहा यांचा शोध घेण्यासाठी अटल सेतू येथील समुद्रात मच्छिमारांची मदत घेतली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकच्या येवला तालुक्यात मुसळधार पाऊस, कांद्याचं झालं नुकसान

Kiwi Icecream: मुलं फळं खायला नाक मुरडतात? १ ट्रिकने बनवा आंबट-गोड किवी आईस्क्रीम, वाचा रेसिपी

मोठी बातमी! मविआकडून उद्धव ठाकरे लढवणार विधान परिषदेची निवडणूक

राघव चड्ढानंतर अरविंद केजरीवाल यांना आणखी एक झटका; बड्या नेत्याचा आम आदमी पक्ष सोडला!

'वंदे भारत'बाबत रेल्वे मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय, PM मोदींनी ट्रेनला दाखवला होता हिरवा झेंडा

SCROLL FOR NEXT