Mulund Police Station Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime : पार्किंगवरून भांडण, महिलेकडून विनयभंगाच्या गुन्ह्याची धमकी; भीतीपोटी वृद्धाने संपवले आयुष्य

Mumbai News: एका ६७ वर्षीय जेष्ठ नागरिकाला पार्किंगवरून झालेल्या भांडणातून विनयभंग केल्याचा खोटा गुन्हा दाखल करेल, अशी महिलेने धमकी दिल्याने या जेष्ठ नागरिकाने लोकलखाली आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

Saam Tv

मुंबईमधील मुलुंडमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका महिलेने पार्किंगवरून झालेल्या भांडणातून विनयभंगाच्या गुन्ह्याची धमकी दिल्याने भीतीपोटी एका ६७ वर्षीय वृद्धाने आपलं जीवन संपवल्याची घटना घडली आहे.

खुशाल दंड, असे या मयत जेष्ठ नागरिकाचे नाव आहे. आरपीचे नाव कुमकुम, असं आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत खुशाल दंड आणि या प्रकरणातील आरोपी कुमकुम या मुलुंडच्या मनीशा प्राईड इमारतीमध्ये राहतात. त्यांची काही दिवसांपूर्वी पार्किग वरुन वाद झाला होता. यात कुमकुमने दंड यांना मारहाण करीत धमकावले होते. यानंतर दंड यांनी मुलुंड रेल्वे स्थानकाजवळ लोकल खाली आत्महत्या केली.

या प्रकरणी दंड यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून कुमकुम मिश्राच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा मुलुंड पोलिसांनी दाखल केला. यानंतर पोलिसांनी कुमकुमला अटक केली. त्यांनतर तिची जामिनावर मुक्तता झाली.

पार्किंग सारख्या शुल्लक कारणावरून झालेले भांडण, त्यात महिलेने विनयभंग केल्याची दिलेली धमकी, यामुळे धक्का बसलेल्या दंड यांनी आत्महत्या करुन जीवन संपविले. मात्र त्यांच्या घरी त्यांची पत्नी आता एकटी आहे. यामुळे या परिसरात शोककळा आणि संताप व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Valentine Special Cake : तुमच्या पार्टनरसाठी घरच्या घरी बनवा टेस्टी गुलाब फ्लेवर केक, वाचा सोपी रेसिपी

Zilla Parishad Election Result 2026 LIVE Updates : आमदाराला मोठा धक्का, मुलाचा दारूण पराभव

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam : 'क्रांतिज्योती विद्यालय मराठी...' ला मिळाले घवघवीत यश; निर्मात्यांनी सीक्वलची घोषणा करत दिलं मोठं सरप्राइज

Maharashtra Live News Update: बदलापूरमध्ये आदिवासी महिलांची पाण्यासाठी वणवण

IND vs PAK: पाकिस्तान सुधारणार नाही... भारतासोबत खेळण्यासाठी घातल्या नव्या अटी, वाचा नेमकं काय म्हणाले

SCROLL FOR NEXT