Mumbai Crime Saam Tv
मुंबई/पुणे

Shocking: बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी चोरी, घरफोडीचा बनाव रचला; मुलीच्या प्रियकरासोबतही..., महिलेने केलं भयंकर कांड

Mumbai Crime: मुंबईमध्ये भयंकर घटना घडली. एका महिलेने प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी स्वत:च्याच घरामध्ये चोरी केली. तिचे मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत देखील अफेअर होते. या प्रकरणी पोलिसांनी महिलेला अटक केली.

Priya More

मुंबईतील दिंडोशी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बीएमसी कर्मचारी रमेश धोंडू हलदिवे यांच्या बायकोने आपल्या प्रियकरासोबत पळून जाण्याच्या तयारीत असताना घरातील सोन्याचे दागिने चोरून ते प्रियकराकडे दिल्याचे उघड झाले. त्यानंतर तिनेच दिंडोशी पोलिस ठाण्यात घरफोडीची खोटी तक्रार दाखल करून नवऱ्यावर संशय घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तपासादरम्यान पोलिसांनी हा बनाव उघड केला आणि उर्मिला रमेश हलदिवेला अटक करून तिच्या ताब्यातून तब्बल साडेदहा तोळे सोने जप्त करण्यात आले.

हा प्रकार गोरेगाव पूर्व येथील संतोषनगर बीएमसी कॉलनीमध्ये घडली आहे. बीएमसी वॉटर डिपार्टमेंटमध्ये नोकरी करणारे रमेश हलदिवे आणि त्यांची बायको उर्मिला यांचे १८ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. काही दिवसांपूर्वी उर्मिलाने अचानक नवऱ्याला सांगितले की घरातील कपाटामधील दागिने गायब झाले आहे. तिने नवऱ्यावरच चोरीचा संशय व्यक्त केला.

त्यानंतर दोघांनी मिळून दिंडोशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. सुरुवातीला पोलिसांना ही घटना घरफोडीसारखी वाटली. मात्र उपनिरीक्षक अजित देसाई यांनी सखोल तपास सुरू केला. घरफोडीचे कोणतेही चिन्ह दिसत नसल्याने पोलिसांनी घरातील सदस्यांची कॉल डिटेल्स आणि लोकेशन तपासले. त्यातून धक्कादायक बाब समोर आली.

उर्मिलाचे सोशल मीडियावरून दुसऱ्या पुरुषाशी संबंध असल्याचे आणि ती त्याच्यासोबत घर सोडून पळून जाण्याची योजना आखत असल्याचे पोलिस तपासातून उघड झाले. तपास पुढे नेताना पोलिसांना कळले की, उर्मिलाने घरातील दागिने चोरून विकले आणि जवळपास दहा लाख रुपये आपल्या प्रियकराच्या खात्यात जमा केले.

एवढेच नाही तर उर्मिलाचे संबंध स्वतःच्या १८ वर्षीय मुलीच्या प्रियकरासोबतही असल्याचे समोर आले. चोरी केलेल्या दागिन्यांपैकी काही दागिने तिने मुलीच्या प्रियकरालाही दिल्याचे कॉल डिटेल्समध्ये स्पष्ट झाले. चोरीच्या घटनेनंतर ती सतत मुलीच्या प्रियकराशी फोनवर बोलत असल्याचेही पोलिसांनी उघड केले. चौकशीत मुलीच्या प्रियकराने सुरुवातीला पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला मात्र कडक चौकशीनंतर त्याने सर्व कबुली दिली.

यानंतर पोलिसांनी उर्मिला आणि मुलीच्या प्रियकराला आमनेसामने चौकशीसाठी बसवले असता उर्मिलाने गुन्ह्याची कबुली दिली. तिने सांगितले की, ती पतीला सोडून प्रियकरासोबत जाण्याची तयारी करत होती. पोलिसांनी उर्मिलाने सांगितलेल्या ज्वेलरी शॉपमध्ये विकलेले दागिने जप्त केले असून तिला अटक केली. अटकेनंतर तिला कोर्टात हजर करण्यात आले. तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. या घटनेमुळे सध्या मुंबईमध्य खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navapur : युरियाचा कृत्रिम तुटवडा; किंमतीपेक्षा अधिक दराने युरिया बॅगची विक्री, शेतकऱ्यांची होतेय अडवणूक

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार? मोठ्या पदावरील युवा नेता महायुतीच्या वाटेवर

Prithvi Shaw-Sapna Gill Case: पृथ्वी शॉला मुंबई कोर्टाचा दणका; विनयभंग प्रकरणात ठोठावला दंड

Angina Symptoms: भारतीय महिलांच्या हृदय आरोग्यासाठी आवश्यक माहिती अन् प्रभावी उपाय

Nepal Protest: नेपाळमधील अस्थिरतेचा भारतावर काय होणार परिणाम? अर्थव्यवस्था अन् देशाची सुरक्षेवर संकट

SCROLL FOR NEXT