धावत्या ट्रेनमध्ये चढताना महिलेचा पाय घसरला अन्... Saam Tv
मुंबई/पुणे

धावत्या ट्रेनमध्ये चढताना महिलेचा पाय घसरला अन्...

स्टेशनवर घडलेली ही घटना सीसीटीव्हीत कैद

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - रेल्वे मध्ये चढताना प्रवासी पडल्याच्या घटना तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील. अशाच प्रकारची एक घटना मुंबईतील रेल्वे स्टेशनवर घडली आहे. पण एका महिला कॉन्स्टेबलने या महिलेचे प्राण वाचवले आहे. मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर चालत्या ट्रेनमध्ये चढताना एका 50 वर्षीय महिलेचा पाय घसरून रेल्वेखाली जाणार होती. तेवढ्यात RPF च्या एका महिला कॉन्स्टेबलने अतिशय त्या महिलेचा जीव वाचवला. स्टेशनवर घडलेली ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. तसेच, महिला कॉन्स्टेबलचे कौतुकही केले आहे.

हे देखील पहा -

RPF च्या महिला कॉन्स्टेबल सपना गोलकर यांनी वेळीच कारवाई केली नसती, तर ती महिला घसरु प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमधील अंतरात पडली असती. कॉन्स्टेबल गोलकर यांच्या धाडसी कृतीसाठी रेल्वे संरक्षण दलाकडून त्यांचे कौतुक करण्यात आले आहे.

सीसीटीव्हीत असे दिसून येत आहे की, सँडहर्स्ट रोड रेल्वे स्टेशनवर महिला ट्रेनमध्ये चढत असताना अचानक या महिलेचा पाय घसरला आणि ती खाली पडली. ती रेल्वेखाली जाणार, तेवढ्यात समोर RPF च्या महिला कॉन्स्टेबलने धाव घेत या महिलेला बाजूला खेचून तिचा जीव वाचवला.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धाड धाड...! विद्यार्थ्याकडून भर वर्गात गोळीबार; ४ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: नाशिक- संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात, एकाचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी

Parbhani Firing: जुना वाद पुन्हा उफाळला; प्राध्यापक मुंडेंच्या घरावर बेछूट गोळीबार,परिसरात खळबळ

Weight Loss : वजन कमी करणाऱ्यांसाठी पोहे वरदान, फक्त टाका 'हे' २ पदार्थ

MS Dhoni Injury Update : चेन्नई सुपर किंग्ज संकटात असतानाच महेंद्रसिंग धोनी घेणार मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT