Bhayandar Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Bhayandar News: भाईंदरमध्ये नशेखोरांची दादागिरी, महिला पोलिसाला थेट बांबूने बेदम मारहाण, संतापजनक घटना

Bhayandar Crime News: भाईंदरमध्ये अमली पदार्थ विरोधी कारवाई करण्यासाठी गेलेल्या एका पोलीस पथकावर अचानक नशेखोरांनी हल्ला चढवला. यावेळी एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला लाकडी बांबूने बेदम मारहाण करण्यात आली.

Satish Daud

महेंद्र वानखेडे, साम टीव्ही भाईंदर

Mira Bhayandar Crime News

अमली पदार्थ विरोधी कारवाई करण्यासाठी गेलेल्या एका पोलीस पथकावर अचानक नशेखोरांनी हल्ला चढवला. यावेळी एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला लाकडी बांबूने बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेत महिला पोलीस जखमी झाली आहे. ही धक्कादायक घटना भाईंदरच्या धारावी परिसरात मंगळवारी (२० फेब्रुवारी) रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या प्रकरणी उत्तन सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी (Police) तिघांच्या मुसक्या आवळला आहेत. अब्बास अली मिर्झा (वय ३८) अंकुर भारती (वय २८) आणि राजू गौतम (वय १९) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

राज्यभरात ड्रग्ज तस्करीच्या वाढत्या घटना लक्षात घेता, मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातर्फे सध्या अमली पदार्थ विरोधात कारवाई करण्यात येत आहे. दररोज नशेबाजांची धरपकड करून गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. (Latest Marathi News)

अशातच बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास अमली पदार्थ विरोधी शाखेच्या ५ जणांचे पथक भाईंदर पश्चिम येथील उत्तन परिसरातील धावगी डोंगर येथे गेले होते. त्यावेळी १५ ते २० जणांनी पोलिसांशी वाद घालून मारहाण केली. यामुळे पोलिसांना जीव वाचवून माघारी फिरावं लागलं.

यावेळी काही नशेबाजांनी एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला लाकडी बांबूने बेदम मारहाण केली. या मारहाणीत लता एकलदेवी या गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापुरात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी

Weather Update: पुढील ३ दिवस पावसाचे; दक्षिण महाराष्ट्रासह विदर्भात पाऊस पडणार, 'या' जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट

Girls Shirt Style: जिन्सवर ट्राय करा हे ७ ट्रेंडी लेटेस्ट शर्ट; ऑफिस किंवा कॉलेजमध्ये दिलास सगळ्यात ग्लॅमरस

Mumbai Tourism: मुंबईकरांसाठी खुशखबर! 'गंगा आरती'चा दिव्य अनुभव घ्यायचाय? तर 'या' २ ठिकाणांना नक्कीच भेट द्या

Dog Abuse Case : विकृतीचा कळस! तरुणाचा कुत्रीवर बलात्कार, आरोपीच्या तोंडाला काळं फासलं, चपलांचा हार घालून धिंड काढली

SCROLL FOR NEXT