पिंपरी-चिंचवडमध्ये मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेवर ब्लेडने हल्ला  गोपाल मोटघरे
मुंबई/पुणे

पिंपरी-चिंचवडमध्ये मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेवर ब्लेडने हल्ला

गळ्यातील दागिने लुटण्याचा प्रयत्न

गोपाल मोटघरे

पुणे - पिंपरी चिंचवड Pimpri शहरातील वाकड परिसरामध्ये पुन्हा एकदा एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. पहाटे मॉर्निंग वॉक Morning Walk करायला गेलेल्या एका ज्येष्ठ महिलेवर एका अज्ञात आरोपीने ब्लेडने गळ्यावर वार करून हल्ला केला आहे. या हल्ल्यात रेखा ज्ञानेश्वर गिरमे ही ज्येष्ठ महिला जखमी झाली आहे. रेखा गिरमेवर ब्लेडने वार करून गळ्यातील दागिने लुटण्याचा प्रयत्न हल्लेखोरांनी केला आहे. या वेळी रेखा गिरमे यांनी त्या हल्लेखोराला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला.

मात्र हल्लेखोरांनी रेखा गिरमेच्या गळ्यावर ब्लेड सारख्या तीक्ष्ण हत्याराने हल्ला करून तसेंच बेदम मारहाण करून पळ काढला. वाकड परिसरातील अति उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या ओमेगा सोसायटी समोर ही घटना घडली आहे. रेखा गिरमे या पहाटे 5 वाजता ओमेगा सोसायटी समोरील रस्त्यावर फिरायला गेलेल्या असताना कुणीतरी अज्ञात हल्लेखोर त्यांच्या मागून आला, त्यावेळी रेखा ह्या हेडफोन वर भजन ऐकत असल्याने त्यांना आपल्या मागून कुणीतरी येतय याची चाहूल लागली नाही.

हे देखील पहा -

मात्र याचाच फायदा घेत हल्लेखोरांने रेखा त्यांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याचा प्रयत्न केला. ही बाब लक्षात येताच रेखा यांनी त्या हल्लेखोरांला प्रतिकार केला. मात्र त्या व्यक्तीने रेखा यांच्या गळ्यावर ब्लेडने वार केला आणि तोंडावर बेदम ठोसे मारून तो पळून गेला. या प्रसंगातून वाचण्यासाठी रेखा यांनी आरडा ओरड केली. तेव्हा नागरकांनी धाव घेतली आणि रेखा यांना घरी पोचविले. मात्र या घटनेच्या थोड्या वेळा नंतर रेखा यांच्या घराच्या मागच्या बाजूने एक अज्ञात व्यक्ती संशयास्पदरित्या फिरतांना आढळून आला.

तोच व्यक्ती खिडकीमधून पुन्हा पून्हा गिरमे यांच्या घरात डोकावत असल्याचं CCTV फूटेज मध्ये स्पष्ट दिसत असल्याची बाब रेखा यांच्या कुटुंबियांच्या लक्षात आली. त्यांनी त्या व्यक्तीला थांबविण्यासाठी प्रयत्न देखील केला. मात्र त्या व्यक्तीने पुन्हा तिथून पळ काढला. दरम्यान या घटनेमुळे गीरमे कुटुंब पूर्णतः हादरून गेले असून सध्या दहशततीच्या सावटाखाली आहेत. रेखा यांच्यावर ज्या व्यक्तीने हल्ला केला.

तोच व्यक्ती पुन्हा घरी येऊन पाहिणी करत असेल तर ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे गिरमे कुटुंबियांना वाटत आहे. घटनेत रेखा यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे त्या जखमी झाल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणी वाकड पोलिसांनी अज्ञाता विरुद्ध जबरी चोरी, मारहाण सारखे गुन्हे दाखल केले आहेत. मात्र रेखा यांच्या घराची पाहणी करणारा इसम कोण ? या बाबद पोलिसांनी माहिती का घेतली नाही? आणि हल्ला करणाऱ्या व्यक्ती विरोधात खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणीचे गुन्हे दाखल का केले नाहीत ? या बाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

French Beans Chutney Recipe : फरसबीची भाजी आवडत नाही? मग बनवा चटपटीत चटणी, मुलं आवडीने टिफिन खातील

Bigg Boss Marathi 6 : "Captain नाही winner आहेस तू..."; प्रेक्षकांनी ठरवला 'बिग बॉस मराठी ६' चा विजेता, 'तो' सदस्य घर गाजवणार

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! दररोज २०० रुपये गुंतवा अन् १० लाख मिळवा; वाचा कॅल्क्युलेशन

Maharashtra Live News Update: शिर्डीत मकर संक्रांतीचा उत्साह, आकर्षक फुलांच्या सजावटीने साई मंदिर सजले

Weather Update : राज्यात थंडी गायब, तापमानाचा पारा वाढला; राज्यात आज कुठे कसे हवामान?

SCROLL FOR NEXT