Pune Crime NEws Saam TV
मुंबई/पुणे

Pune News : सोसायटीतील सदस्याच्या पत्नीचा पॉर्नस्टार म्हणून उल्लेख, 140 जणांना पाठवला मेल, पुण्यातील धक्कादायक प्रकार

Pune Crime News : फिर्यादी या संदर्भात जाब विचारण्यास गेले असता आरोपीने त्यांना धमकी दिली आणि जे करायचं ते कर असं धमकावले.

साम टिव्ही ब्युरो

अक्षय बडवे

Pune News : पुण्यातील एका मोठ्या हाऊसिंग सोसायटीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोसायटीत राहण्याच्या एक सदस्याच्या पत्नीबाबत आक्षेपार्ह मेल इतर सभासदांना पाठवल्याने एकच खळबळ उडाली आहे. (Pune News)

सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका सदस्याची पत्नी पॉर्नस्टार सारखी दिसते, असा मेल सोसायटीच्या 140 सदस्यांना करण्यात आला आहे. कोंढवा भागात असणाऱ्या सोसायटीमध्ये एका महिलेला पॅार्नस्टार म्हणून संबोधन करत विनयभंग करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

याप्रकरणी महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून कोंढवा पोलिसांनी शेखर बाबूलाल धोत्रे या सदस्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या आरोपी शेखर धोत्रे याने "**ची बायको पोर्न अॅक्ट्रेस सारखी दिसते", अशी अश्लील भाषा वापरत सोसायटीमधील 140 सदस्यांना मेल पाठवला आहे. (Maharashtra News)

फिर्यादी या संदर्भात जाब विचारण्यास गेले असता आरोपीने त्यांना धमकी दिली आणि जे करायचं ते कर असं धमकावले. हा सगळा प्रकार त्या महिलेने पोलिसांना सांगितला. त्यांनतर पोलिसांनी धोत्रे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Khana Saree Contrast Blouse: लग्नसमारंभासाठी खणाच्या साडीवर सुंदर दिसतील हे ७ ट्रेंडी कॉन्ट्रास्ट ब्लाऊज डिझाइन्स

Maharashtra Live News Update : सराईत गुन्हेगार टिपू पठाण यांच्यासह सात जणांवर तिसऱ्यांदा मोक्का कारवाई

LPG shortage : देशात गॅस सिलिंडरचा तुटवडा, खासदारांना संसदेत चहा-कॉफीही मिळेना, खासदाराच्या दाव्याने खळबळ

Summer Tips : उन्हाळ्यात पुदिना अन् कोथिंबीर जास्त दिवस फ्रेश ठेवण्याच्या सोप्या टिप्स

Indian footballer death news खेळताना अचानक मैदानावर कोसळला, २५ वर्षाच्या खेळाडूचा मृत्यू, क्रीडा विश्वावर शोककळा

SCROLL FOR NEXT