Dombivli Crime News
Dombivli Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Dombivli Crime News: मित्राच्या मदतीने काढला प्रियकराचा काटा, डोक्यात बॅट घालून...

Priya More

Dombivli News: डोंबिवलीमध्ये गुन्हेगारीच्या (Dombivli Crime) घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अशामध्ये डोंबिवलीमध्ये आणखी एक हत्येची घटना समोर आली आहे. डोंबिवलीच्या कोळेगावात एका व्यक्तीची निर्घृण हत्या (Dombivli Murder Case) करण्यात आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह दोघांना ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीमध्ये एका महिलेने मित्राच्या मदतीने आपल्या प्रियकराची निर्घृण हत्या केली. डोंबिवलीच्या कोळेगाव परिसरात ही घटना घडली. मारुती हांडे असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. हत्या झालेले मारुती हांडे हे संध्या सिंह या महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये कोळेगाव परिसरात राहत होते. याच दरम्यान संध्याची गुड्डू शेट्टी याच्याशी मैत्री झाली. संध्याचे गुड्डूसोबत प्रेमप्रकरण असल्याचा संशय मारुतीला होता. त्यामुळे या दोघांमध्ये वाद सुरू होते.

शनिवारी दुपारच्या सुमारास संध्या आणि मारुती या दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी गुड्डू देखील घरात उपस्थित होता. गुड्डू आणि संध्या या दोघांनी संतापाच्या भरात मारुती हांडेला बॅटने बेदम मारहाण केली. यामध्ये मारुती यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मारूतीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी आरोपी महिला संध्या सिंह आणि तिचा मित्र गुड्डू शेट्टी यांना ताब्यात घेतले आहे. दोघांंच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरु आहे. पोलिसांकडून याप्रकरणाचा पुढील तपास सुरू केलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Lok Sabha: सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवारांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून नोटीस, नेमकं कारण काय?

Maharashtra Politics: फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर धैर्यशील मोहिते पाटलांनीही थोपटले दंड; माढ्याच्या मैदानात आरपारची लढाई

Raigad News: ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांच्या कारवर हल्ला; आमदार पुत्रासह २५ ते ३० जणांविरोधात गुन्हा

Lok Sabha 2024: काँग्रेसचं ठरलं! राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार; अमेठीतून तगडा उमेदवार मैदानात!

Horoscope Today : तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय? वाचा आजचे संपूर्ण राशिभविष्य

SCROLL FOR NEXT