KDMC Hospital Women Death Saam Tv News
मुंबई/पुणे

KDMC Hospital Women Death : गर्भपाताच्या शस्त्रक्रियेसाठी दाखल, त्याआधीच महिलेचा मृत्यू, नवऱ्याचा गंभीर आरोप; कल्याणमध्ये खळबळ

Kalyan News : महिलेच्या मृत्यूस प्रसूतीगृहातील डॉक्टर जबाबदार असल्याचा आरोप महिलेच्या पतीसह तिच्या कुटुंबियांनी केला आहे. धक्कादायक म्हणजे प्रसूती गृह असलेल्या या रुग्णालयात ICU नसल्याचं देखील समोर आलं आहे.

Prashant Patil

ठाणे : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या कल्याण पूर्वेतील शक्तीधाम प्रसूतीगृहात शांतीदेवी अखिलेश मौर्य या महिलेला गर्भपात आणि कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यासाठी दाखल करण्यात आले होते. तिची शस्त्रक्रिया करण्यापूर्वीच तिची प्रकृती खालावली. तिला इंजेक्शन दिले गेले. तिला प्रसूतीगृहातून खासगी रुग्णालयात नेत असताना तिचा वाटेत मृत्यू झाला. महिलेच्या मृत्यूस प्रसूतीगृहातील डॉक्टर जबाबदार असल्याचा आरोप महिलेच्या पतीसह तिच्या कुटुंबियांनी केला आहे. धक्कादायक म्हणजे प्रसूतीगृह असलेल्या या रुग्णालयात ICU नसल्याचं देखील समोर आलं आहे.

डॉक्टरांनी सांगितलं की, 'आम्ही कोणताही हलगर्जीपणा केला नाही, पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यूचं कारण स्पष्ट होईल'. दरम्यान, दोन महिन्यापूर्वी महापालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात सुवर्णा सरोदे या गरोदर महिलेचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणात दोन डॉक्टरांना महापालिकेनं सेवेतून कमी करत त्यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर अवघ्या महिनाभरातच ही दुसरी घटना घडल्यानं महापालिकेची आरोग्य सेवा ही व्हेंटिलेटरवर असल्याचं दिसून येतेय.

कल्याण पूर्वेतील खडेगोळवली परिसरात राहणारी शांतीदेवी अखिलेश मौर्य ही महिला दोन महिन्याची गर्भवती होती. तिला याआधी तीन मुले आहे. तिच्या पतीने तिचा गर्भपात आणि कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यासाठी महापालिकेच्या शक्तीधाम प्रसूतीगृहात ४ एप्रिल रोजी दाखल केलं होतं. तिचा काल सोमवारी चार वाजता मृत्यू झाला. हे प्रसूतीगृह बाह्य संस्थेस महापालिकेनं चालविण्यास दिलं आहे.

या प्रकरणी तिचा पती अखिलेश यांनी आरोप केला आहे की, 'आपल्या पत्नीच्या मृत्यूस प्रसूतीगृहातील डॉक्टर जबाबदार आहे. माझ्या पत्नीला किडनी स्टोनचाही त्रास होता. ती गुटखा खात होती आणि तिचा मृत्यू झाला आहे', असं हॉस्पिटलकडून सांगण्यात आलं. डॉक्टरांना याबाबत जाब विचारला असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहे.

महिलेच्या पतीने केलेले आरोप डॉक्टरांनी फेटाळून लावले आहे. या प्रकरणी डॉ. गणेश डोईफोडे यांनी सांगितले की, 'शांतीदेवी मौर्य या महिलेला ४ एप्रिल रोजी दाखल केले होते. तिचा गर्भपात आणि कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करायची होती. तिला रक्त कमी होते. तिला रक्त देण्यात आले. तिला काल शस्त्रक्रिया गृहात दुपारी आणण्यात आले होते. तिची प्रकृती खालावली. तिला इंजेक्शन दिले गेले. तिला प्रसूतीगृहातून पुढील उपचारासाठी कल्याण पूर्वेतील अमेय खासगी रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका केली. तिचा खासगी रुग्णालयात नेत असताना मृत्यू झला. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात पाठविला जाणार आहे. प्रसूतीगृहात अतिदक्षता विभाग नाही. हे देखील डॉक्टरांनी मान्य केलं आहे. दरम्यान, महिलेच्या पतीने तिचा मृतदेह महापालिका रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यास विरोध केला आहे. मृतदेह जे.जे. रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवावा अशी मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

SCROLL FOR NEXT