Woman dies after being severely burnt by fire In Sakinaka Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai: स्वयंपाक करताना काळजी घ्या! दुपट्ट्याला आग लागून गंभाररीत्या भाजल्याने महिलेचा मृत्यू...

Mumbai Fire Accident: साकीनाकाच्या (Sakinaka) मोहम्मद कंकाली चाळ, सुलेमन मस्जिदजवळ, नेताजी नगर खाडी नं. ३ येथे ही दुर्घटना घडली आहे.

सुरज सावंत

मुंबई: महिलांनी या बातमीकडे विशेष लक्ष द्या, ही बातमी तुमच्यासाठी आहे. घरात स्वयंपाक बनवताना घ्या विशेष काळजी. जेवण बनवताना दुपट्ट्याला लागलेल्या आगीने २४ वर्षीय महिला भाजल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू (Death by fire) झाला आहे. साकीनाकाच्या (Sakinaka) मोहम्मद कंकाली चाळ, सुलेमन मस्जिदजवळ, नेताजी नगर खाडी नं. ३ येथे ही दुर्घटना घडली आहे. (Be careful when cooking! Woman dies after being severely burnt by fire In Sakinaka)

हे देखील पहा -

19 मार्च रोजी मुस्लिम बांधवांची 'बडी रात' होती. या निमित्ताने सायनाबीबी अल्ताफ शेख या जेवण बनवत होत्या. घरात स्वयंपाक (Cooking) बनवत असताना, त्यांच्या दुपट्ट्याला आग लागून सायनाबीबी या गंभीररीत्या भाजल्या. त्यानंतर स्थानिकांनी त्यांना उपचारासाठी सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान बुधवारी सायनाबीबी यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी साकीनाका पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPS Transferred: दिल्ली पोलीस दलात मोठा फेरबदल; IPS अधिकाऱ्यांसह ७० वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

ऐन धुळवडीत निवडणुकीचा धुरळा उडाला; आसामध्ये काँग्रेसकडून ४२ उमेदवारांची यादी जाहीर, कोणाला कुठून संधी?

Maharashtra Live News Update: शरद पवार दिल्लीला जाणारच, मविआकडून राज्यसभेसाठी नावावर एकमत?

Wednesday Horoscope : संपत्तीवरून कुटुंबातील मतभेद उघड होणार; बुधवारी ५ राशींच्या लोकांची चिंता वाढणार

मुंबईत परप्रांतीय दोन तरुणांनी काढली विदेशी महिलेची छेड; पोलिसांनी बिहारमधून मुख्य आरोपीला घेतलं ताब्यात

SCROLL FOR NEXT