woman died eating poisonous tomato for rat killing
woman died eating poisonous tomato for rat killing saam tv
मुंबई/पुणे

भयंकर! टीव्ही पाहण्याचं वेड महिलेच्या जीवावर बेतलं, महिलेनं खाल्ला उंदीर मारण्यासाठी ठेवलेला टॉमेटो

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मालाड येथील मालवणी परिसरात एक विचित्र घटना घडली आहे. टीव्ही पाहण्याच्या नादात उंदरांना मारण्यासाठी विशारी औषध (Poison on Tomato) ठेवलेला टॉमेटो एका महिलेने (woman death) खाल्ल्याने तिचा मृत्यू झाला. रेखादेवी फुलकुमार निशाद (२७) असं मृत महिलेचं नाव आहे. ही दुर्देवी घटना मालाडमध्ये घडली असून याप्रकरणी मालवणी पोलिसांनी (Mumbai Police) आकस्मिक मृ्त्यूची नोंद केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टीव्ही पहाण्याच्या नादात उंदरांना मारण्यासाठी औषध लावून ठेवलेलं टाॅमेटो खाऊन महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मालाडच्या मालवणीत घडली आहे. रेखादेवी फुलकुमार निशाद असं मृत महिलेचं नाव असून मालवणीच्या मार्वेरोड मालाड जवळील पास्कलवाडी खारोडी येथे त्या राहत होत्या. घरात उंदरांचा उच्छाद वाढल्याने काल बुधवारी सकाळी त्यांनी टॉमेटोला उंदीर मारण्याचे औषध लावून ठेवले होते.

मात्र दुपारच्या सुमारास रेखादेवी या टीव्ही पाहत मॅगी बनवत होत्या. त्यावेळी टीव्ही पाहता पाहता त्या इतक्या दंग झाल्या की, मॅगीत त्यांनी उंदीर मारण्याचे औषध लावलेले टोमॅटो बेसावधपणे टाकले.त्यानंतर काही वेळाने त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

Health Tips: लसणाचे पाणी पिण्याचे फायदे ऐकून आजपासूनच प्यायला कराल सुरूवात

Arunachal Pradesh: फिरायला जाण्याचा प्लॅन करताय, मग एकदा अरुणाचल प्रदेशला भेट द्या

CSK Vs SRH : चेन्नईच्या बॉलर्सची 'सुपर' बॉलिंग; हैदराबादचा १३४ धावांवर उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT