अकोला : माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा अकोल्याचे भाजप खासदार संजय धोत्रे (Sanjay Dhotre) यांच्या घरी आणि अकोला-पूर्णा एक्स्प्रेसमध्ये (bomb explosion) बॉम्बस्फोट होणार आहे, अशी अफवा पसरवणाऱ्या तरुणाला (culprit arrested) अकोला पोलिसांनी अटक केली आहे. नितीन दिलीप गोटुकले (३२) असं अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे. काल बुधवारी रात्री अकोला पोलिसांनी (Akola Police) आरोपी नितीनला ताब्यात घेतलं. आरोपी गोटकुले हा मूळचा नाशिक जिल्ह्यातील बाभुळगाव जहागीर येथील रहिवासी आहे.
काय आहे प्रकरण?
२६ जुलै रोजी मुंबई दक्षिणच्या पोलीस नियत्रंण कक्षाला रात्री १० वाजताच्या सुमारास एका अज्ञात इसमाने फोन कॉल केला. त्या इसमाने अकोला-पूर्णा पॅसेंजर मध्ये तसेच अकोल्याचे भाजप खासदार संजय धोत्रे यांच्या घरी बॉम्बस्फोट होणार आहे,अशी माहीती पोलिसांना दिली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी अकोला पोलिसांना या गंभीर प्रकरणाची माहिती दिली.
त्यानंतर पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राउत, उपविभागीय पोलीस अधीकारी सुभाष दुधगांवकर तसेच स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख संतोष महल्ले,विशेष पोलीस पथक प्रमुख विलास पाटील यांच्यासह अन्य अधिकारी व पोलीस कर्मचारी तातडीने अकोला रेल्वे स्थानक तसेच खासदार संजय धोत्रे यांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्यानंतर रेल्वे स्थानकावर उभी असलेली पूर्णा एक्स्प्रेसमधील प्रवासी आणि रेल्वेची तपासणी करुन रेल्वेत बॉम्ब नसल्याची खात्री केली. खासदार धोत्रे यांच्या निवासस्थानाचीही तपासणी करून बॉम्ब नसल्याची खात्री केली.
अफवा पसरवणाऱ्या तरुणाला अटक
सार्वजनिक शांतता बिघडविण्याचे उद्देशाने जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुध्द अकोल्यातील सिव्हील लाईन पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी विजय पंडीत यांनी लेखी तक्रार दिली. त्यानुसार १८२,५०५, (अ)(ब)भादंवि प्रमाण अदखलपात्र गुन्हा नोंद करून नितीन दिलीप गोटुकले याला अटक केली असून आज गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केले आहे.
Edited By - Naresh Shende
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.