कल्याण-मलंग रोडवर पहाटेच्या सुमारास जिवंत अर्भक ठेवून जाणारी महिला CCTV मध्ये कैद! प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

कल्याण-मलंग रोडवर पहाटेच्या सुमारास जिवंत अर्भक ठेवून जाणारी महिला CCTV मध्ये कैद!

पिशवीत पुरुष जातीचे जिवंत अर्भक आढळून आले असून नवजात अर्भक हे दोन ते तीन दिवसांचे असल्याचे बोलले जात आहे. अर्भक ठेवून जाणारी महिला सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून पोलीस आता सोडून गेलेल्या महिलेचा तपास करीत आहेत.

प्रदीप भणगे

कल्याण : कल्याण-मलंग रोडवर पहाटेच्या सुमारास जिवंत अर्भक आढळले आहे. अर्भक ठेवून जाणारी महिला सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून पोलीस आता सोडून गेलेल्या महिलेचा तपास करीत आहेत. मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणि कल्याण पूर्वेतील कल्याण-मलंग रोडवरील चेतना शाळेजवळ असलेल्या वक्रतुंड मेडिकल समोर पिशवीत कपड्यात गुंडाळलेले नवजात अर्भक ठेवण्यात आले. पहाटे पाचच्या दरम्यान दुकानाचे मालक यांनी ते पाहिले.

हे देखील पहा :

त्यांनी लागलीच मानपाडा पोलीस ठाण्यात संपर्क साधून याची माहिती दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. वंजारी यांच्या पथकाने लागलीच घटनास्थळी जाऊन पहाणी केली. पिशवीत पुरुष जातीचे जिवंत अर्भक आढळून आले असून नवजात अर्भक हे दोन ते तीन दिवसांचे असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे या अर्भकाला पिशवीतुन घेऊन जाताना एक महिलेच सीसीटीव्ही समोर आले. मात्र ती महिला कोण आहे, नक्की तीच आहे का याचा तपास आता पोलीस करत आहेत.

अर्भकाच्या नाळेला चिमटा लावलेल्या नसल्याने घरीच त्याचा जन्म झाला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. त्या बाळाला सकाळी लागलीच तपासणीसाठी पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात हलविण्यात आले. बाळाची आरोग्य तपासणी व अँटिजेन टेस्ट करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून बाळाची प्रकृती उत्तम असून त्याला सध्या देखभालीसाठी जननी आशिष चॅरिटेबल ट्रस्ट येथे ठेवण्यात आले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आरक्षणासाठी आणखी एक आत्महत्या, कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, महाराष्ट्र पुन्हा हादरला!

PCOS misconceptions: PCOS विषयी महिलांच्या मनात असतात 'या' गैरसमजुती; तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला

Maharashtra Live News Update: पंढरपुरात चंद्रभागा नदीने इशारा पातळी गाठली; नदीकाठी पूरस्थिती

Central Government Bonus: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवळीचं गिफ्ट, महिन्याच्या पगाराइतका मिळणार बोनस, वाचा पात्रता अन् अटी?

First Mobile Phone: 1 किलो वजनाचा मोबाईल अन् 10 तास चार्जिंग; वाचा रंजक इतिहास

SCROLL FOR NEXT