Bank Of Indiaच्या ATM मध्ये स्किमरच्या सहाय्याने खाते धारकांच्या खात्यातून पैसे लंपास ! जयश्री मोरे
मुंबई/पुणे

Bank Of Indiaच्या ATM मध्ये स्किमरच्या सहाय्याने खाते धारकांच्या खात्यातून पैसे लंपास !

जयश्री मोरे

जयश्री मोरे

मुंबई : मुलुंडच्या हनुमान चौक परिसरामध्ये असलेल्या बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मध्ये स्किमरच्या सहाय्याने खाते धारकांच्या खात्यातून दोन लाख 65 हजार रुपये लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आतापर्यंत 18 खाते धारकांच्या खात्यातून पैसे वजा झाले असल्याच्या तक्रारी मुलुंडच्या नवघर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आल्या आहेत.

हे देखील पहा-

या बँकेच्या एटीएम मध्ये 5 डिसेंबर पूर्वी अज्ञातांनी स्कीमर मशीन बसविली होती आणि या मशीनच्या सहाय्याने या एटीएमचा वापर करणाऱ्या नागरिकांच्या कार्ड डिटेल आणि या वर बसविलेल्या पिन होल कॅमेराच्या सहाय्याने खाते धारकांचा पासवर्ड नोंदविला गेला होता. 5 डिसेंबर नंतर ज्यांनी या एटीएमचा वापर केला आहे त्यांच्या खात्यातून पैसे वजा व्हायला सुरुवात झाली. त्यानंतर पोलिसांना एकाच एटीएम मधून व्यवहार केलेल्या नागरिकांच्याच खात्यातून पैसे वजा होत असल्याचं निदर्शनास आलं आणि हा एटीएम मीनिंग चा प्रकार असल्याचं पुढे पोलिसांच्या निदर्शनास आलं.

दरम्यान, बँक व्यवस्थापनाने या संदर्भात तातडीने पावले उचलत ज्या खाते धारकांच्या खात्यातून पैसे वजा झाले आहेत त्यांना त्यांचे पैसे तातडीने रिफंड केले आहेत. परंतु अशा पद्धतीने स्किमरच्या सहाय्याने ग्राहकांच्या खात्यातून पैसे लंपास केल्याची घटना समोर आल्यामुळे अन्यथा विरोधात नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच याचा शोध सध्या नवघर पोलीस घेत आहेत यासाठी या एटीएमचे सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Esha Gupta: ईशाच्या सौंदर्याचा जलवा; फोटोंवरुन नजर हटेना!

Beed News : नाथसागरातील पाण्यासाठी लोक लढा; बीडच्या १४० गावांचा सहभाग

Nitesh Rane Controversial Statement: नितेश राणेंवरून महायुतीत वाद, अजित पवार गटाने देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत केली मोठी मागणी

Thane Crime Story : एक खून, ना CCTV, ना ठोस पुरावे; अवघे दोन क्ल्यू अन् उकललं त्या हत्येचं गूढ

Nashik Crime : विहिरीत कासव पाहायला सांगितलं, नंतर ३ शाळकरी विद्यार्थ्यांना ढकलून दिलं; नाशिकमधील धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT