Uddhav Thackeray Latest News Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: ठाकरे गटावर नवं संकट, आमदार अपात्रता निकालानंतर आणखी एक धक्का बसणार?

Uddhav Thackeray News: एकीकडे उद्धव ठाकरे यांचा पक्षाचं नाव आणि चिन्हासाठी संघर्ष सुरू असताना दुसरीकडे त्यांचं मशाल चिन्हही धोक्यात आलं आहे.

Satish Daud

Uddhav Thackeray Latest News

खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. त्यांच्या या निकालानंतर ठाकरे गटाने तातडीने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. एकीकडे उद्धव ठाकरे यांचा पक्षाचं नाव आणि चिन्हासाठी संघर्ष सुरू असताना दुसरीकडे त्यांचं मशाल चिन्हही धोक्यात आलं आहे. कारण, या चिन्हावर पुन्हा एकदा समता पक्षाने दावा करत आक्रमक भूमिका घेतली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दिलेलं मशाल चिन्ह परत मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, अशी माहिती समता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडल यांनी दिली आहे. मशाल चिन्हासाठी आम्ही निवडणूक आयोगात दादही मागणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. (Latest Marathi News)

यासाठी आम्ही आवश्यक त्या कागपत्राची पूर्तता केल्याचंही उदय मंडल म्हणाले. त्याचबरोबर आगामी लोकसभा निवडणुकीत आम्ही मशाल चिन्हावरच निवडणूक लढवणार असल्याचं मंडल यांनी सांगितलं. जर यावेळी आम्हाला निवडणूक आयोगाने दाद दिली नाही, तर आम्ही न्यायालयात धाव घेणार, असा इशाराही मंडल यांनी दिला आहे.

समता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडल यांनी कल्याणमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना मंडल म्हणाले, उद्धव ठाकरे यांना मशाल चिन्ह अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी तात्पुरता स्वरूपात देण्यात आले होते. मात्र त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या मेहरबानीमुळे त्यांना हे चिन्ह पुढे देखील मिळाले. मात्र मशाल हे चिन्ह समता पार्टीचे आहे मशाल समता पार्टीची ओळख असल्याचं मंडल यांनी सांगितलं.

उद्धव ठाकरे सध्या भाड्याची मशाल वापरत असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. समता पार्टीने निवडणूक आयोगाकडे कागदपत्रांची पूर्तता केली आहे. त्यामुळे हे मशाल हे चिन्ह आम्हालाच मिळेल,लोकसभा निवडणुकीच्या आधी उद्धव ठाकरेंचे मशाल चिन्ह त्यांच्याकडून जाणार आहे आणि ते समता पार्टीकडे येणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Sonu Nigam : 'ये दिल दीवाना...' रस्त्यावर थांबून छोट्या चाहत्यासोबत सोनू निगमनं गायलं गाणं, पाहा VIDEO

आता देशात एकसमान मानकांद्वारे घेण्यात येणार मातांची काळजी, NABH कडून नवीन आरोग्य मानकांचा समावेश

Maharashtra Election 2024 : कांदा महागला, महायुतीला फायदा होणार? जाणून घ्या बांग्लादेश अन् इराणसोबत कनेक्शन

Winter Season: थंड हवामानात चांगल्या आरोग्यासाठी 'हे' पदार्थ ठरतात फायदेशीर

SCROLL FOR NEXT