एकीकडे 2022 मध्ये मुंबई महापालिका निवडणूक आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात लढली जाणार याची चर्चा असताना तेजस ठाकरे सक्रिय राजकारणात येणार का अशी चर्चा सुरू झाली आहे - Saam Tv
मुंबई/पुणे

ठाकरे कुटुंबियांचे 'विव्हियन रिचर्ड्स' राजकारणात सक्रीय होणार?

साम टिव्ही

(रश्मी पुराणिक, साम टिव्ही)

मुंबई : एकीकडे 2022 मध्ये मुंबई महापालिका निवडणूक BMC Elections आदित्य ठाकरे Aditya Thackeray यांच्या नेतृत्वात लढली जाणार याची चर्चा असताना तेजस ठाकरे Tejas Thackeray सक्रिय राजकारणात Politics येणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.या चर्चेला कारण तेजस ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या Shivsena सर्व नेत्यांनी शुभेच्छा वर्षाव केला आहे. will Tejas Thackeray enter in active Politics

सोशल मीडियाच्या माध्यमातून तेजस याना शुभेच्छा देण्यात येत आहेत. उद्धव ठाकरे Uddhav Thacekray यांचे विश्वासू आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर Milind Narvekar यांनी 'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्राच्या माध्यमातून तेजस यांना 'ठाकरे कुटुंबियांचे विव्हियन रिचर्ड्स' अशी उपमा देत शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे आता आदित्य नंतर तेजस ठाकरे राजकारणात सक्रिय होणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

दरम्यान, स्व. बाळासाहेब ठाकरे Balasaheb Thackeray यांनी सध्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर १९९७ साली मुंबई महापालिका निवडणुकीचे नेतृत्त्व सोपवले होते. त्याच प्रमाणे आता उद्धव ठाकरे आगामी महापालिका निवडणुकीची जबाबदारी आपले पूत्र व कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर सोपवणार आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं मुंबई महापालिका निवडणूक लढवली होती. त्यावेळी सेनेचे सगळ्यात जास्त म्हणजे 110 नगरसेवक निवडून आले होते. १९९७ च्या त्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी विद्यमान 45 नगरसेवकांची तिकीट कापले होती. आता आदित्य ठाकरे त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन हाच कित्ता गिरवणार का अशी चर्चा होऊ लागली आहे. २०२२ च्या निवडणुकीत कुणाला तिकिट मिळणार याची चर्चा आतापासूनच सुरु झाली आहे. will Tejas Thackeray enter in active Politics

तरुण आणि नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार का? तिकीट वाटपात आदित्य ठाकरे यांना तितकं स्वातंत्र्य असणार का? याचीही चर्चा शिवसेनेच्या आणि राजकारणाच्या क्षेत्रात होऊ लागली आहे. आदित्य ठाकरे इतर पक्षातील चांगल्या उमेदवारांना सेनेत खेचून आणण्यात यशस्वी होणार का याकडे ही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांचा वेगवान आढावा

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

SCROLL FOR NEXT