Saam Special - आदित्य ठाकरे करणार मुंबई महापालिका निवडणुकीचे नेतृत्व (व्हिडिओ)

स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी सध्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर १९९७ साली मुंबई महापालिका निवडणुकीचे नेतृत्त्व सोपवले होते. त्याच प्रमाणे आता उद्धव ठाकरे आगामी महापालिका निवडणुकीची जबाबदारी आपले पूत्र व कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर सोपवणार आहेत.
आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे
Published On

(रश्मी पुराणिक, साम टिव्ही)

मुंबई : स्व. बाळासाहेब ठाकरे Balasaheb Thackeray यांनी सध्याचे मुख्यमंत्री व शिवसेना Shivsena पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्यावर १९९७ साली मुंबई Mumbai महापालिका निवडणुकीचे नेतृत्त्व सोपवले होते. त्याच प्रमाणे आता उद्धव ठाकरे आगामी महापालिका निवडणुकीची जबाबदारी आपले पूत्र व कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे Aditya Thackeray यांच्यावर सोपवणार आहेत. Aditya Thackeray to lead BMC Elections

1997 ला बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेची निवडणूक उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केलं होतं याच प्रमाणे आदित्य ठाकरे महाविकास आघाडीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर मोठी जबाबदारी देण्याचा निर्णय घेतलाय. 2017 मध्ये आदित्य ठाकरे यांनी महापालिका निवडणुकी च्या रणनीतीत मोठी जबाबदारी पार पडली होती. त्यानंतर मुंबई महापालिकेवर शिवसेनेचे सत्ता आली. आता पुन्हा एकदा आदित्य मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची धुरा आपल्या खांद्यावर पेलणार आहेत. Aditya Thackeray to lead BMC Elections

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं मुंबई महापालिका निवडणूक लढवली होती. त्यावेळी सेनेचे सगळ्यात जास्त म्हणजे 110 नगरसेवक निवडून आले होते. १९९७ च्या त्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी विद्यमान 45 नगरसेवकांची तिकीट कापले होती. आता आदित्य ठाकरे त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन हाच कित्ता गिरवणार का अशी चर्चा होऊ लागली आहे. २०२२ च्या निवडणुकीत कुणाला तिकिट मिळणार याची चर्चा आतापासूनच सुरु झाली आहे.

तरुण आणि नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार का? तिकीट वाटपात आदित्य ठाकरे यांना तितकं स्वातंत्र्य असणार का? याचीही चर्चा शिवसेनेच्या आणि राजकारणाच्या क्षेत्रात होऊ लागली आहे. आदित्य ठाकरे इतर पक्षातील चांगल्या उमेदवारांना सेनेत खेचून आणण्यात यशस्वी होणार का याकडे ही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. Aditya Thackeray to lead BMC Elections

आदित्य ठाकरे
बीडच्या चुंबळी गावात छेडछाडीला कंटाळून 14 वर्षीय मुलीची आत्महत्या

दुसऱ्या बाजूला मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप पूर्ण ताकदीने उतरणार हे निश्चित आहे. त्यातच भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जवळीक वाढली आहे. नुकतीच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट झाली. त्या भेटीबाबतही चर्चा सुरु आहे. दुसरीकडे शिवसेना तरुण नेतृत्व असलेल्या आदित्य ठाकरेंकडे निवडणुकीची जबाबदारी सोपविण्याचा गांभिर्याने विचार करते आहे. आता आदित्य ठाकरे भाजपसमोर आव्हान उभे करणार का, हे निवडणुकीच्या काळातच दिसणार आहे.

Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com