Will services like Ola-Uber closed on March 16? See what the Mumbai High Court said ... Saam Tv
मुंबई/पुणे

Online Cab Service: ओला-उबरसारख्या सेवा १६ मार्चला बंद होणार? पहा हायकोर्टानं काय सांगितलं...

Online Cab Service Latest News: मुंबई हायकोर्टातील वकील सविना क्रॅस्टो (Adv. Savina R. Crasto) यांनी जनहित याचिका दाखल केली होती, त्यावर हायकोर्टानं निर्णय दिला आहे.

सुरज सावंत

मुंबई: ऑनलाईन कॅब बुकिंग सेवा राज्यात बंद होणार का? असा प्रश्न निर्माण झालायं. त्याचं कारण म्हणजे ओला, उबर (OLA - Uber Cabs) यांसारख्या ॲपआधारित सेवा चालवणाऱ्यांनी १६ मार्चपर्यंत परवानासाठी अर्ज केले नाहीत आणि जर त्यांना परवाना मिळाला नाही तर त्यांना सेवा चालवता येणार नाहीत असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दिला आहे. मुंबई हायकोर्टातील वकील सविना क्रॅस्टो (Advocate Savina R. Crasto) यांनी जनहित याचिका (Public Interest Litigation) दाखल केली होती, त्यावर हायकोर्टानं निर्णय दिला आहे. (Slamming lawlessness in sector, Bombay HC asks all cab aggregators to apply for licenses by March 16)

हे देखील पहा -

राज्यभरातील ॲग्रिगेटर सेवा देणारे (Aggregator Services) (ओला, उबरसारख्या सेवा चालवणारे) यांना केंद्र सरकारच्या मार्गदर्शक नियमावलीप्रमाणे परवाना मिळवता यावेत यासाठी राज्य सरकारने बुधवार, ९ मार्चपर्यंत अधिसूचना काढावी, असंही आपल्या आदेशात हायकोर्टाने म्हटलं आहे. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती विनय जोशी यांच्या खंडपीठाने हे आदेश जारी केले आहेत.

ॲपआधारित कॅब सेवा (Cab Services) देणाऱ्या कंपन्यांकडून ग्राहकांच्या तक्रारींची योग्य दखलच घेतली जात नाही आणि तक्रारींचे निवारण होत नाही. त्यामुळे अनेक प्रवाशांना आर्थिक नुकसानाबरोबरच मनस्तापही सहन करावा लागतो. अनेकांच्या तक्रार निवारण व्यवस्थेत साचेबद्ध स्वरुपाच्याच तक्रारींचा समावेश असल्याने अनेक तक्रारींची दखलच घेतली जात नाही", असं म्हणणं मांडणारी जनहित याचिका मुंबई हायकोर्टातील वकील सविना क्रॅस्टो यांनी केली आहे. याअंतर्गत खंडपीठाने हे निर्देश दिले आहेत. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार संबंधीत परवान्यांसाठी वेळेत अर्ज केले नाही आणि त्यांना परवाना मिळाला नाही तर, या कंपन्यांना आपली सेवा स्थगित करावी लागण्याची शक्यता आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friendship Day 2025 : 'फ्रेंडशिप डे'ला मित्रांसाठी खास बनवा 'मिष्टी दोई', नात्यात वाढेल गोडवा

Marathi Film Awards: महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांची घोषणा; महेश मांजरेकर, मुक्ता बर्वेसह 'या' कलाकारांचा होणार सन्मान

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का; भारताने घेतला महत्वाचा निर्णय

Amravati News: ग्रामपंचायत कार्यालय बनला कुस्तीचा आखाडा; सरपंच आणि सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी|VIDEO

अंगावर लघवी अन् प्रायव्हेट पार्टवर काठीनं मारलं, बिल्डरचा २ तास छळ; नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT