मुंबईत विरुद्ध दिशेने गाडी चावल्यास थेट तुरुंगवारी, गाडी जप्त करण्याचेही आयुक्तांचे आदेश

हेल्मट (Helmet) न घालणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. मात्र विरूद्ध दिशेने गाडी चालवणाऱ्यांवर थेट गुन्हा नोंदवून गाडी जप्त करण्याचे आदेश पांडे यांनी दिले आहेत.
Sanjay Pande
Sanjay PandeSaam TV
Published On

मुंबई : बेशिस्त वाहन चालकांनो आता जर नियम मोडाल तर थेट तुरुंगात जाणार आहेत. मुंबई पोलिस सोमवार पासून विरूद्ध दिशेने गाडी चालवणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल करणार असून चालकांची गाडीही जप्त करणार आहेत. तसे आदेशचं मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे (Mumbai Police Commissioner Sanjay Pandey) यांनी त्यांच्या फेसबुक लाइव्हमध्ये दिले आहेत.

संजय पांडे हे प्रत्येक रविवारी मुंबईकरांशी फेसबुकद्वारे (Facebook) संवाद साधणार असून आठवड्यांच्या कामांची माहिती देणार आहेत. मुंबईत बेशिस्त वाहन चालकांना वटणीवर आणण्याचे मुंबईच्या पोलिस आयुक्तांनी ठरवले आहे. यासाठी पांडे यांनी सर्व पोलिस ठाण्याच्या वरिष्ठांना व विशेषता वाहतूक पोलिसांना विरूद्ध दिशेने गाडी चालवणारे व विना हेल्मेट गाडी चालवणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेत.

हेल्मट (Helmet) न घालणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. मात्र विरूद्ध दिशेने गाडी चालवणाऱ्यांवर थेट गुन्हा नोंदवून गाडी जप्त करण्याचे आदेश पांडे यांनी दिलेत. यामुळे गाडी चालकाला अनेक ठिकाणी फिरावे लागेल, कायदेशीररित्या न्यायालयासमोर जावे लागेल, मी माझे अधिकारी व अंमलदारांना याप्रकरणी भादंवि कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या सूचना केल्या आहेत. सोमवारपासून ही कारवाई सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितलं.

हे देखील पहा -

यापूर्वी सर्व सामान्याच्या समस्या जाणूंन पांडे यांनी आपण गाड्या टोइंग बंद करण्याच्या विचारात असल्याचे सांगितले होते. फक्त नागरिकांनी कुठेही वाहतूकीला अडथळा ठरेल अशा ठिकाणी गाड्या न लावण्याची विनंती केली होती. कारण अनेकदा महत्वाच्या कामाला बाहेर पडलेल्या व्यक्ती काही कारणास्तव गाडी पार्क करून गेल्यास आणि तेवढ्यात गाडी टोइंग झाल्यास गैरसोय होते. त्यामुळेच पांडेंनी नागरिकांनी सहकार्य केल्यास गाड्या टोइंग करणं बंद करण्याचा विचार सुरू असल्याचे म्हटले होते.

याशिवाय ध्वनी प्रदुषणाबाबतही (Noise pollution) पोलीस कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले. विशेष करून बांधकामाच्या ठिकाणी वेळेचे बंधन न पाळता कधीही कामे करण्यात येतात, यावर पांडे यांनी नाराजी व्यक्त केली. याबाबतही मी अंमलदार व अधिकाऱ्यांना कळवले असून त्याबाबतही काय पावले उचलणार हे आपल्याला लवकरच कळेल, असे पांडे यांनी सांगितले. याशिवाय परदेशात राहणाऱ्या व्यक्तींच्या मालमत्ता बळकावण्याचे प्रकार कानावर आले आहेत. याबाबत पांडे यांनी मालमत्ता बळकवणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com