maratha reservation how many kunbi records found in maharashtra latest updates Saam TV
मुंबई/पुणे

Maratha Aarakshan: मनोज जरांगे मुंबईत पोहचण्याआधीच मराठ्यांना आरक्षण मिळणार? पडद्यामागील हालचालींना वेग

Maratha Reservation News: मनोज जरांगे पाटलांसह लाखो मराठा बांधव मुंबईत धडकण्याआधीच राज्य सरकार मराठा आरक्षणावर तोडगा काढणार का? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Satish Daud

CM Eknath Shinde on Maratha reservation

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्यासह आज लाखो मराठा बांधव मुंबईच्या दिशेने कूच करणार आहे. यासाठी जोरदार तयारी करण्यात आली असून सकाळपासून जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा बांधवांनी गर्दी केली आहे. जीव गेला तरी चालेल, पण आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, अशी भूमिका मराठा आंदोलकांनी घेतली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हीच बाब लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. दुपारी ३ वाजता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवास्थानी ही बैठक होणार आहे. या बैठकीला मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

बैठकीत मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) अंतिम चर्चा होणार असल्याचं देखील माहिती आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटलांसह लाखो मराठा बांधव मुंबईत धडकण्याआधीच राज्य सरकार मराठा आरक्षणावर तोडगा काढणार का? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुंबईतील मोर्चा टाळावा, राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक आहे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीमध्ये अधिवेशन घेऊन आम्ही कायदा करणार आहोत, असंही त्यांनी म्हटलं आहे.

मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आणि इतर समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का आम्ही लावणार नाही, हा शब्द सरकारचा आहे, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. दुसरीकडे जरांगे मात्र, आपल्या इशाऱ्यावर ठाम असून त्यांनी मुंबईत येण्याची तयारी केली आहे. त्यामुळे जरांगे मराठा बांधवांसह मुंबईत धडकणार? की त्याआधीच सरकार मोठा निर्णय घेणार? याकडेच सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT