Sharad Pawar Vs Ajit Pawar Saam Tv
मुंबई/पुणे

Ajit Pawar: अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला नवं चिन्ह मिळणार? 1 ऑक्टोबरला 'घड्याळ'चा फैसला?

Sharad Pawar group: अजित पवारांच्या राष्ट्रवादीला घड्याळ ऐवजी दुसरं चिन्ह देण्यात यावे,अशी मागणी करणारी याचिका शरद पवार यांच्या पक्षानं सुप्रीम कोर्टात केली होती. येत्या 1 ऑक्टोबरला याबाबत सुनावणी होणार आहे.

Tanmay Tillu

विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. तेव्हा पक्ष आणि चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात त्यावर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

त्यानंतर निवडणूक चिन्ह वापरण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीसाठी 1 ऑक्टोबरची तारीख निश्चित केली आहे. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं टेंशन वाढलंय. नेमकं या याचिकेत काय मागणी केलीय? हे जाणून घेऊ..

शरद पवारांच्या पक्षाकडून सुप्रीम कोर्टात मागणी करण्यात आली आहे की, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला नवं चिन्ह द्या. याचिकेचा निकाल लागत नाही तोपर्यंत घड्याळ चिन्ह वापरण्यास बंदी घाला, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच अजित पवारांना नव्या चिन्हाची मागणी करण्यास सांगा, असंही या याचिकेत म्हणण्यात आलं आहे. यातच घड्याळ चिन्हावर खंडपीठाचा 1 ऑक्टोबरला फैसला येऊ शकतो.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार गटाला अपक्षांचा मोठा फटका बसला होता. शरद पवार गटाला निवडणुकीत तुतारी हे चिन्हं मिळालं. तर काही अपक्षांना तुतारी सदृश्य ट्रंपेट हे चिन्ह मिळालं होतं. या चिन्हामुळे मतदार संभ्रमीत झाला आणि शरद पवारांची मतं अपक्षांना मिळाली होती. विधानसभेत हा घोळ टाळण्यासाठी आणि अजित पवारांच्या अडचणी वाढवण्यासाठी शरद पवारांकडून हा नवा डाव टाकण्यात आलायं.

यापूर्वी सुप्रीम कोर्टानं ही याचिका दाखल करून घेण्यास नकार दिला होता. आता 1 ऑक्टोबरला या याचिकेवर सुनावणी होणार आहे. त्यावर सुप्रीम कोर्ट काय निर्देश देणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. त्यामुळे घड्याळाची टिक टिक विधानसभेत सुरू राहणार की नाही हे पाहण्यासाठी साऱ्या राज्याचं लक्ष सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

SCROLL FOR NEXT