Aditya Thackeray Latest News saam tv
मुंबई/पुणे

Kalyan Politics: आदित्य ठाकरे कल्याणमधून निवडणूक लढणार? ठाकरे-शिंदे गटाकडून आव्हान-प्रतिआव्हान

Kalyan Lok Sabha News: आदित्य ठाकरे कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगलीय. या चर्चेनंतर पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गट व शिवसेना ठाकरे गटाकडून आव्हान प्रतिआव्हान सुरू झालेत आहे.

साम टिव्ही ब्युरो

>> अभिजित देशमुख

Kalyan Lok Sabha News:

आदित्य ठाकरे कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगलीय. या चर्चेनंतर पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गट व शिवसेना ठाकरे गटाकडून आव्हान प्रतिआव्हान सुरू झालेत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचा हा मतदारसंघ आहे.

ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख हर्षवर्धन पालांडे यांनी आदित्य ठाकरे जर कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली तर आम्हाला आनंदाच आहे. आम्ही ती जागा शंभर टक्के जिंकू, असा विश्वास व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाने आक्रमक पवित्रा घेतला शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी कार्यसम्राट खासदार श्रीकांत शिंदे यांच्या समोर आदित्य ठाकरेंनी डिपॉजिट वाचवून दाखवावं असं आव्हान केलंय.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचा हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापल्याचे दिसून येतेय. (Latest Marathi News)

याबाबत कल्याण मधील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केलंय. उपजिल्हाप्रमुख हर्षवर्धन पालांडे यांनी सांगितले की, आदित्य ठाकरे जर कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असतील तर त्यांचं स्वागत आहे. त्यांचं अभिनंदन आहे. आम्हाला देखील त्याचा आनंद आहे, आदित्य ठाकरेंनी कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवल्यास शंभर टक्के ही जागा जिंकू, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी थेट ठाकरे गटाला आव्हान केलं आहे.

मोरे यांनी सांगितले की, ''आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक लढवली आहे. त्या वरळी मतदारसंघात सचिन अहिर, सुनील शिंदे या दोन आमदारांचा बळी घेऊन ते वरळीला आमदार झाले आहेत. कल्याण लोकसभा हा श्रीकांत शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. या ठिकाणी कार्यसम्राट म्हणून श्रीकांत शिंदे यांची ओळख आहे.''

ते म्हणाले, ''आदित्य ठाकरे यांनी कल्याण मध्ये त्यांचं डिपॉझिट वाचवावं इतकं काम खासदार श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय. त्यामुळे हे स्वप्न जे बघण्याचं काम आहे ते ठाकरे गटाने सोडावं. त्यांनी साध्या नगरसेवकाच्या सीट निवडून आणून दाखवाव्यात, असं त्यांना आमचं आव्हान आहे.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

New Marathi Movie: 'वाढलेलं वय अन् लग्नाची जुळवणी', सुबोध भावे अन् तेजश्रीनं घातला घाट; ट्रेलरने उत्सुकता वाढवली

MNS Manifesto: आम्ही हे करु! गडकिल्ले, रोजगार ते महिलांची सुरक्षा, मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध!

Diabetes symptoms: योनीमार्गात जखम किंवा संसर्ग असल्यास असू शकतं मधुमेहाचं लक्षण!

Sanjay Raut News : गद्दारासाठी पक्षाचं अधःपतन केल्याने त्यांना वैफल्य आलंय; संजय राऊतांचा फडणवीसांवर प्रतिहल्ला

Journey Marathi Movie : अनपेक्षित प्रवासाची कथा उलगडणाऱ्या 'जर्नी' चित्रपटाचा थरार, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

SCROLL FOR NEXT