Satara Lok Sabha Election: सातारा लोकसभेवरुन महायुतीत रस्सीखेच! राष्ट्रवादी - भाजपनंतर शिंदे गटानेही थोपटले दंंड

Satara Loksabha Election 2024 Seat: अजित पवार आणि भारतीय जनता पक्षाने दावा सांगितल्यानंतर आता शिवसेना शिंदे गटानेही सातारा लोकसभा लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यामुळे महायुतीत चांगलाच संघर्ष होण्याची चिन्हे दिसत आहेत.
Satara Loksabha Election 2024 News: Shivsena Shinde Group Claim on Satara Loksabha Seat After Ajit Pawar Group
Satara Loksabha Election 2024 News: Shivsena Shinde Group Claim on Satara Loksabha Seat After Ajit Pawar GroupSaam Digital
Published On

ओंकार कदम, सातारा| ता. १५ डिसेंबर २०२३

Satara Loksabha Election 2024 News:

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणूकांचे सर्वच राजकीय पक्षांना वेध लागले आहेत. लोकसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली असून जागा वाटपावरुन वादाच्या ठिणग्याही पडताना दिसत आहेत.

सध्या राज्यात सध्या असलेल्या शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपमध्येही जागा वाटपावरुन संघर्ष रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण अजित पवार आणि भारतीय जनता पक्षाने दावा सांगितल्यानंतर आता शिंदे गटानेही सातारा लोकसभा लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

सातारा लोकसभेसाठी शिंदे गटानेही दंड थोपटले!

सातारा लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीमध्ये चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळत आहे. सातारा लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक पद हे सातारा जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे यांना देण्यात आले आहे. त्यानुसार पाच विधानसभा मतदारसंघात सध्या शिवसेनेच्या (Shivsena) माध्यमातून लोकसभा उमेदवारी बाबत मागणी केली जात आहे. तसेच सातारा लोकसभा शिवसेना शिंदे गट लढवणार असल्याचे मत शरद कणसे यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले आहे.

"गेली २५ वर्ष हा मतदार संघ शिवसेनेकडे आहे. पारंपारिक युतीमध्येही ही जागा शिवसेनेला सोडण्यात येते. यावेळीही सातारा लोकसभा ही शिवसेनेने लढावी अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. शिवसेनेसाठी पोषक वातावरण आहे. नक्कीच आमचा उमेदवार निवडून येईल.." असे शरद कणसे यावेळी म्हणाले.

अजित पवार गट, भाजपचाही दावा...

दरम्यान, सातारा लोकसभेवर याआधी राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटानेही दावा केला होता. कर्जतमधील मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी सातारा लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे म्हणले होते. अजित पवार यांच्या या दाव्यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी साताऱ्यातून भाजपचाच उमेदवार असल्याचे सांगितले होते. त्यामुळेच सातारा लोकसभेवरुन महायुतीत चांगलाच कलगीतुरा रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com