Mumbai Crime Saam TV
मुंबई/पुणे

अनैतिक संबंधास अडसर ठरत होता पती; पत्नीने गाठला क्रूरतेचा कळस

पोलिसांनी आरोपी महिलेसह तिच्या प्रियकरासह बेड्या ठोकल्या आहेत.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: मुंबईतील गोवंडी (Govandi) परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बैगनवाडी भागात राहणाऱ्या ३२ वर्षीय पत्नीने प्रियकराच्या मदतीने आपल्याच ३४ वर्षीय पतीचे हत्या केल्याचं उघड झालं आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेसह तिच्या प्रियकरासह बेड्या ठोकल्या आहेत. (Mumbai Govandi Crime News)

इरफान खान (वय 34) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर, नजीरा आणि सदरे आलम अशी आरोपींची नावे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिला नजीरा गोंवडी परिसरातील बैगनवाडी भागात राहते. काही दिवसांपूर्वी तिचे आपल्याच परिसरात राहणाऱ्या सदरे आलम नामक व्यक्तीसोबत सुत जुळले होते.

यावरून आरोपी महिला आणि तिच्या पतीमध्ये सतत वाद सुरू होते. त्यामुळे अनैतिक संबधास अडसर ठरणाऱ्या पतीचा आरोपी पत्नीने प्रियकराच्या साथीने काटा काढला. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी दोनही आरोपींवर भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tandoor Paneer Tikka Recipe: रेस्टॉरंटस्टाईल तंदूर पनीर टिक्का घरी कसा बनवायचा? पाहा ही सोपी रेसिपी

Hair Oil Benefits: केस धुण्यापूर्वी केसांना तेल लावण्याचे फायदे काय?

Face Care: डलनेस आणि टॅन कमी करण्यासाठी आठवड्यातून २ वेळा 'हा' घरगुती खास फेसपॅक नक्की लावा

Mantralaya Bribe Case: निधी मंजुरीसाठी ६ लाखांची लाच; मंत्रालयातल्या आणखी एका अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं

नाशिकची घटना ताजी असताना संभाजीनगरात टेम्पो विहिरीत कोसळला|VIDEO

SCROLL FOR NEXT