Rajesh Tope SaamTV
मुंबई/पुणे

'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई का नाही; आरोग्यमंत्री झोपले आहेत का? - संभाजी ब्रिगेड

'इतर परीक्षेचे वसूल केलेले पैसे विद्यार्थ्यांना तात्काळ परत मिळाले पाहिजेत.'

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

पुणे : आरोग्य विभागाच्या परीक्षेचे हॉल तिकीटामधील (Hall tickets) गैरप्रकार तसेच परीक्षा रद्द करण्यापासून सुरू झालेला सर्व गोंधळातील प्रवास आरोग्य विभागाच्या (Department of Health) ढीसाळ कारभारामुळे आणि नियोजनामुळे आज परीक्षा केंद्रावर पेपर उशिरा सुरू झाल्याने परत गोंधळ उडाला. निष्क्रिय प्रशासन असतानासुद्धा आरोग्यमंत्री त्यावर कठोर पावले उचलत नाहीत. आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) झोपलेत का असाच प्रश्न निर्माण झाला आहे. असा प्रश्न संभाजी ब्रिगेडने उपस्थित केला आहे. (Why not take action against health department officials)

हे देखील पहा -

सर्व परीक्षा MPSC मार्फत घ्या -

राज्यात बेरोजगारांची संख्या जास्त आहे. सर्व विभागातील लाखो पदे रिक्त आहेत अशी परिस्थिती असताना देखील राज्य सरकार नोकर भरती करायला तयार नाही. सर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (MPSC) मार्फत घेतल्या पाहिजेत. वेगवेगळ्या विभागाच्या स्पर्धा परीक्षा देण्यासाठी मुलांची झुंबड असताना त्यांना योग्य मार्गदर्शन आणि सुरळीत केंद्रे मिळत नाहीत. महाराष्ट्रातील लाखो गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांना आर्थिक दृष्टया वेळोवेळी नुकसानीत टाकले जात आहे.

'इतर परीक्षेचे वसूल केलेले पैसे विद्यार्थ्यांना तात्काळ परत मिळाले पाहिजेत.' आजतर बरेच विद्यार्थी परीक्षेचे सेंटर इतर जिल्ह्यात आल्यामुळे अडचणीच्या काळात सुद्धा प्रवास खर्च करून पोहोचलेले असताना ऐनवेळी परीक्षा सुरू न होणे, एकाच विद्यार्थ्यांना सारख्या वेळेत दोन पदांच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करणे हा आरोग्य विभागाचा आणि आरोग्य विभागाच्या हेकेखोर संचालक मा. अर्चना पाटील यांचा गलथान कारभार जबाबदार आहे. अधिकाऱ्यांची पोट भरलेले असल्यामुळे गेंड्याची कातडी पांघरून सगळी लोकं कारभार करत आहेत. या सर्व प्रकारची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. मुलांच्या भविष्याशी कोणीही खेळू नये. आजच्या परीक्षेची उच्चस्तरीय चौकशी करून राज्याचे आरोग्य संचालक व परीक्षेचे मुख्य अधिकारी यांचे तात्काळ निलंबित करावे अशी मागणी संभाजी ब्रिगेड'चे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे (Santosh Shinde) यांनी केली आहे.

प्रवास भत्ता राज्य सरकारने द्यावा -

सर्व मुलांची होणारे आर्थिक नुकसान लक्षात घेऊन भरपाई म्हणून सर्व मुलांना खर्च झालेला प्रवास भत्ता राज्य सरकारने द्यावा. आरोग्य विभागाच्या परीक्षेतील भोंगळ कारभाराची नैतिक जबाबदारी स्विकारून आरोग्य संचालक अर्चना पाटील व परीक्षेसंदर्भातील प्रमुख अधिकारी मा. देखमुख यांनी राजीनामा द्यावा किंवा राज्य सरकारने त्यांना निलंबित करावे अशी मागणी देखील संतोष शिंदे यांनी केली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीची आत्महत्या की हत्या? लग्नाच्या 10 महिन्यात नेमकं काय घडलं?

Accident: मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; कारच्या पुढील भागाचा चुरा, २ जणांचा जागीच मृत्यू

Local Body Election : स्थानिक निवडणुकीत आता 'साडी पॅटर्न'; अवघ्या महिलांची 40 रुपयावर मतदारांची बोळवण, VIDEO

Smriti Mandhana: स्मृती मानधनाच्या लग्नात विघ्न; वडिलांच्या पाठोपाठ होणाऱ्या नवऱ्याची प्रकृती बिघडली

BMC Election : महापालिकेची ही शेवटची निवडणूक, हातातून मुंबई गेली तर...; राज ठाकरे स्पष्टच बोलले, VIDEO

SCROLL FOR NEXT