Ajit Pawar  Saam Tv
मुंबई/पुणे

Ajit Pawar : अजित पवार विधानसभेत का संतापले? नेमकं काय झालं?

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज सभागृहात संताप व्यक्त केला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नागपूर - 'टीईटी' घोटाळ्यासंदर्भात सादर करण्यात आलेल्या तारांकित प्रश्नातील सत्तारुढ पक्षातील मंत्र्याशी आणि आमदारांशी संबंधित दोन भाग परस्पर वगळल्यामुळे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज सभागृहात संताप व्यक्त केला. (Ajit Pawar Latest News)

विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केलेला प्रश्न अत्यंत गंभीर असून सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना बदलण्याचा कोणालाही अधिकार नाही, त्यामुळे अधिवेशन संपण्यापूर्वी या प्रकरणाची चौकशी करुन त्याची माहिती सभागृहात देण्यात येईल व दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असे आश्वासन विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी दिली. त्यानंतर हा प्रश्न उत्तरासाठी आणि निवेदनासाठी राखून ठेवण्यात आला.

विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी टीईटी घोटाळ्या (Tet Scam) संबंधी तारांकित प्रश्न सुचना क्र.50491 दाखल केली होती. दाखल केलेला प्रश्न सात भागांचा होता. मात्र प्रश्नोत्तराच्या यादीत मंत्र्यांसह सत्ताधारी आमदारांशी संबंधित दोन भाग विधानमंडळ सचिवालयाने जाणीवपूर्वक वगळले. या टीईटी घोटाळ्यामुळे मेरीटच्या अनेक विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. महाराष्ट्र विधानसभा नियम 70 मध्ये एखादा प्रश्न स्विकृत व्हावा यासाठी त्याने एकुण 18 शर्ती पूर्ण केल्या पाहिजेत. (Tajya News)

माझ्या प्रश्न सुचनेतील वगळलेला प्रश्न भाग 18 शर्तीमधील नेमक्या कोणत्या शर्ती पूर्ण करीत नाहीत, हे मला काळले पाहिजे. तारांकीत प्रश्न सुचनेतील वगळलेला भाग विद्यमान मंत्री व सत्ताधारी आमदारांची मुले आणि नातेवाईकांचा समावेश आहे. संबधित शिक्षकांवर 60 दिवसात सुनावणी घेऊन कारवाई करा, असे आदेश असतानाही केवळ काही मंत्री महोदयांची, काही आमदार महोदयांची व काही अधिकाऱ्यांची मुले या घोटाळ्यात असल्याने कारवाईला उशीर होत आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Pak सामना खेळणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंना काळं फासणार, शिवसेना नेत्याचा इशारा

Maharashtra Politics: 'देवा तूच सांग' नाशिकमध्ये शरद पवार गटाने भाजपला डिवचले; शहरात 'या' बॅनरची चर्चा|VIDEO

India Vs Pakistan: थोड्याच वेळात महामुकाबला! सामन्यावर पावसाचे सावट? वाचा पिच रिपोर्ट काय सांगतो

Barvi Hills Tourism : कोकणची मजा बदलापूरमध्ये! मुंबईजवळचं Hidden Paradise, जंगल सफर, फोटोग्राफीची मजा एकाच ठिकाणी

kriti sanon: 'कभी नहीं सोचा था....'; क्रिती सॅननने पहिल्यांदाच काढला टॅटू, सांगितलं खास कारण

SCROLL FOR NEXT