Sharad Pawar Withdraw Resignation Saam TV
मुंबई/पुणे

Sharad Pawar Withdraw Resignation: ...म्हणून मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता; पवारांनी सांगितलं खरं कारण

Sharad Pawar Withdraw Resignation: आज शरद पवार यांनी पत्रकारपरिषद घेत आपण राजीनामा मागे घेणार असल्याचं जाहीर केलं.

Satish Daud

Sharad Pawar Withdraw Resignation: महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मंगळवारी (२ मे) पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकारी राज्यभरात ठिकाठिकाणी आंदोलन करण्यास सुरूवात केली. दरम्यान, आज शरद पवार यांनी पत्रकारपरिषद घेत आपण राजीनामा मागे घेणार असल्याचं जाहीर केलं. (Breaking Marathi News)

यावेळी आपण राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा का निर्णय घेतला होता? याचं खरं कारणही शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितलं आहे. 'सार्वजनिक जीवनातील सुमारे ६३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर मी सदर जबाबदारीतून मुक्त व्हावे, अशी माझी भुमिका होती, याशिवाय पक्षातील नवीन चेहऱ्यांना संधी मिळवी, उत्तराधिकारी तयार व्हावेत असं माझं मत होतं', असं शरद पवार यांनी सांगितलं आहे. (Latest Marathi News)

'मात्र, माझ्या निर्णयाच्या तीव्र भावना उमटल्या. मी निर्णयाचा फेरविचार करावा यासाठी माझे हिंतचिंतक, प्रेम आणि विश्वास असणारे कार्यकर्ते यांनी संघटीत होऊन एकमुखाने तर काहींनी प्रत्यक्ष भेटून आवाहन केलं. महाराष्ट्रातून विविध पक्षांचे सहकारी व कार्यकर्ते यांनी मी अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा घ्यावी अशी आग्रही विनंती केली. त्यामुळे मला माझा निर्णय मागे घ्यावा लागला', असंही शरद पवार म्हणाले.

पवार पुढे म्हणाले, 'लोक माझे सांगाती' हेच माझ्या प्रदीर्घ व समाधानी सार्वजनिक जीवनाचे गमक आहे. माझ्याकडून आपल्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही. आपण दर्शवलेले प्रेम आणि विश्वास यामुळे मी भारावून गेलो आहे. (Breaking Marathi News)

'माझ्या निर्णयापासून परावृत्त होण्यासाठी आपण सर्वांनी केलेली आवाहने व विनंत्या यांचा विचार करून तसेच पक्षाने गठीत केलेल्या समितीने मी पुन्हा अध्यक्षपदी राहावे' या निर्णयाचा देखील मान राखून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे'

माझ्या पुढील कार्यकाळात पक्षामध्ये संघटनात्मक बदल करणे, नव्या जबाबदाऱ्या सोपविणे, नवीन नेतृत्व निर्माण करणे यावर माझा भर असेल. यापुढे पक्षवाढीसाठी तसेच पक्षाची विचारधारा व ध्येयधोरणे जनमाणसांपर्यंत पोचवण्यासाठी मी अधिक जोमाने काम करील, असंही शरद पवारांनी ठामपणे सांगितलं आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT