Rajya Sabha Elections
Rajya Sabha Elections Saam TV
मुंबई/पुणे

Rajya Sabha Elections: महाविकास आघाडीने का घेतला आक्षेप? पत्रात काय म्हटलंय वाचा!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक -

मुंबई : आज राज्यसभेच्या (RajyaSabha) सहा जागांसाठीचं मतदान पार पडलं. मात्र, सुरुवातीपासून मविआ विरुद्ध भाजपा असा टोकाचा संघर्ष या निवडणुकीत पहायला मिळाला. आता मतदान पार पडल्यानंतर देखील तो कायम आहे. कारण, भाजप आणि महाविकास आघाडी (BJP And MVA) या दोघांनी देखील निवडणूक आयोगाकडे (Election Commission) तक्रार करत काही आमदारांच्या मतदानावर आक्षेप घेत त्यांची मतं बाद करण्याची मागणी केली आहे. शिवाय भाजपा आणि मविआने आमदारांच्या मतांवर आक्षेप घेतल्यामुळे राज्यसभा मतमोजणी लांबली आहे.

भाजपने राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे यांची मत बाद करण्याची मागणी केली असून याबाबत त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला लिहिले पत्र लिहंल आहे. (Jitendra Awhad and Yashomati Thakur)

अशातच आता महाविकास आघाडीने देखील सुधीर मुनगंटीवार आणि अपक्ष आमदार रवी राणा यांच्या मतदानावर आक्षेप घेतला असून त्याबाबतचं पत्र त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांना पाठवलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार आणि अपक्ष आमदार रवी राणा (Sudhir Mungantiwar and Ravi Rana) यांचं मत बाद करण्याची विनंती केली आहे.

आघाडीकडून देण्यात आलेल्या पत्रामध्ये, सुधीर मुनगंटीवार यांनी स्वत:च्या पक्षाच्या निवडणूक प्रतिनिधींशिवाय इतर व्यक्तींना मतपत्रिका उघडपणे दाखवून निवडणुक प्रक्रियेचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसंच आमदार रवी राणा यांनी देखील मतदानाच्या प्रक्रियेचे उल्लघंन केले आहे. राणा यांनी हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) हे धार्मिक पुस्तक उघडपणे प्रदर्शित करून मतदान प्रक्रियेचा भंग केला आहे.

शिवाय या कृतीद्वारे त्यांनी इतर मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला असून त्यांची मतदान करताना नियमांचे घोर उल्लंघन केलं आहे. त्यामुळे निवडणुक आयोगाने २०१७ मधील अहमद पटेल प्रकरणात, मतदानाच्या मोजणीच्या वेळी निवडणूक नियमांचे उल्लंघन करून दिलेले कोणतेही मतं रद्द केले जाईल अशा अटी ठेवल्या होत्या. त्याच अटीनुसार वरील २ प्रकरणांतील बाबी लक्षात घेता, आम्ही आयोगाला विनंती करतो की त्यांनी या प्रकरणाची चौकशी करावी आणि निवडणूक नियमांच्या तरतुदींचे उल्लंघन करणारी मते रद्द करावी असं पत्रात लिहलं आहे.

काय केलं उल्लघंन ?

सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हातात मतपत्रिका दिल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. तर आपण मतपत्रिकेला हात लावलेला नाही. नियमांमध्ये राहून मी मतपत्रिका पाहिली, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

तर दुसरीकजे भाजपने राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांच्या यांच्या मतांवर आक्षेप घेतला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी त्यांची मतपत्रिका राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्या हातात दिल्याचा आरोप केला होता. तर, काँग्रेसच्या मंत्री यशोमती ठाकूर यांनी नाना पटोले (Nana Patole) यांना मतपत्रिका दाखवल्याचा आक्षेप घेण्यात आला होता. सुहास कांदे यांच्यासंदर्भात देखील या प्रकारचा आक्षेप घेण्यात आला आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report | काळ आला होता पण...हेलिकॉप्टर दुर्घटनेत अंधारे बचावल्या Jayant Patil सुद्धा सुखरूप

Special Report | Sushma Andhare यांचं हेलिकॉप्टर क्रॅश, अंधारे थोडक्यात बचावल्या

MI vs KKR, IPL 2024: KKR कडून एकटा वेंकटेश लढला! स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी मुंबईला १७० धावांची गरज

Today's Marathi News Live : पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत 397 उमेदवारांचे 512 अर्ज दाखल

Maharashtra Politics: संजोग वाघेरे मावळमधील ठाकरे गटाचे उमेदवार, संजोग वाघेरेंना पोलिसांनी अडवलं

SCROLL FOR NEXT