Kashmiri Students in Pune Speak Out After Pahalgam Attack Saam Tv
मुंबई/पुणे

Pahalagam Attack: आमची चूक काय? त्यांची शिक्षा आम्हाला का? काश्मिरी विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण

Kashmiri Students in Pune Speak Out After Pahalgam Attack: काश्मीरमधील तरुण-तरुणी पुण्यामध्ये शिक्षण घेत आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर या विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आमची चूक काय? त्यांची शिक्षा आम्हाला का?, असे सवाल ते करत आहेत.

Priya More

सागर आव्हाड, पुणे

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातील ठिकठिकाणी काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याची घटना घडत आहे. पुण्यात सरहद या संस्थेत तसेच इतर ठिकाणी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये देखील भीतीचे वातावरण तयार झाले असून हे विद्यार्थी उद्या पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेणार आहेत.

पहलगाम येथील घटनेनंतर या विद्यार्थ्यांना ठिकठिकाणी मारहाण केली जात आहे. यावर हे विद्यार्थी म्हणाले की, 'आमची काहीही चूक नसून आम्ही काश्मीर येथून बाहेर शिक्षण घ्यायला आलो आहे. आमची कोणतीही चूक नसताना आम्हाला शिक्षा का दिली जात आहे?, असा सवाल या विद्यार्थ्यांनी केला आहे.

पुणे शहरात जवळपास १ हजाराहून अधिक काश्मीरी विद्यार्थी हे शिक्षण घेत आहे. यातील काही मुलं ही सुट्ट्यांच्या निमित्ताने काश्मीर येथे गेले होते. पहलगाम येथील घटनेनंतर या विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं असून हे विद्यार्थी आता परत शिक्षणासाठी येत नसल्याचं या विद्यार्थ्यांकडून सांगितलं जात आहे.

आम्ही काश्मीर येथील मुलांना शिक्षणासाठी बाहेर आणत आहोत ते इथं शिक्षण घेत आहे. पहलगाम येथे जी घटना घडली आहे त्या घटनेचे दुःख आम्हाला देखील खूप असून आम्ही या घटनेचा निषेध करतो. पण कुठेतरी आम्हाला देखील या घटनेवरून टार्गेट केलं जात आहे ते अत्यंत चुकीचं आहे. असं देखील या विद्यार्थ्यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahadev Temple: शिवमंदिरात महिलांनी केव्हा जावे? जाणून घ्या योग्य वेळ

Valheri Waterfall: मुसळधार पावसामुळे वाल्हेरी धबधब्याचे सौंदर्य खुलले; पर्यटकांची प्रचंड गर्दी| VIDEO

Muharram : मोहरमच्या आनंदावर विरजण, आगीत हनुमंतचा मृत्यू; काळजात धस्स करणारी घटना

GK: टोमॅटो अन् बटाटापेक्षा स्वस्त काजू! जाणून घ्या भारतातील 'हे' अनोखे ठिकाण

Pimpri Chinchwad : हिंजवडीच्या पुरस्थितीनंतर पीएमआरडीएचे कठोर पाऊल; चार जणांवर केला गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT