Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Saam TV
मुंबई/पुणे

Dasara Melava: ठाकरे की शिंदे; शिवाजी पार्कवर यंदा कोणाची होणार सभा? BMC ने सांगितलं...

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde: ठाकरे की शिंदे; शिवाजी पार्कवर यंदा कोणाची होणार सभा? BMC ने सांगितलं...

Satish Kengar

>> गिरीश कांबळे

Shiv Sena Dasara Melava 2023 News :

दसरा मेळाव्यावरुन ठाकरे गट आणि शिवसेना (शिंदे गट) पुन्हा एकदा समोरासमोर आल्याचं दिसत आहे. दादर येथील शिवाजी पार्कवर (Shivaji Park) यंदा कोणाचा दसरा मेळावा पार पडणार, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी मैदान मिळावं म्हणून मुंबई महापालिकेकडे अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र परवानगी देण्याबाबत पालिकेकडून दिरंगाई केली जात असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे.

यातच दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क मैदान कोणाला द्यायचं? याबाबत दोन दिवसात निर्णय घेऊ, असं मुंबई महापालिका प्रशासनाचे ठाकरे गटाला आश्वासन दिलं आहे.

आज बीएमसी जी नॉर्थ विभागीय कार्यालयात ठाकरे गटाचे आमदार अनिल परब आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी हे शिवाजी पार्क मैदाना संदर्भात बीएमसीचा निर्णय नेमका काय ? याबाबत जाब विचारण्यासाठी गेले होते. त्यावर काही निकषांच्या आधारे आम्ही दोन दिवसात निर्णय देऊ, असंआश्वासन बीएमसी प्रशासनाकडून देण्यात आलं आहे. (Latest Marathi News)

मुंबई महापालिकेच्या म्हणण्यानुसार, १ ऑगस्ट रोजी मुंबई महापालिकेला शिवसेना शिंदे गटाचे पत्र प्राप्त झालं. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाने ७ ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा पत्र शिवाजी पार्क मैदान दसरा मेळाव्यासाठी अर्ज देण्यात आलं.

तर शिवसेना ठाकरे गटाकडून ७ ऑगस्टलाच शिवाजी पार्क मैदानात मेळावा घेण्यासाठी पत्र प्राप्त झालं. त्यामुळे सर्व निकषांची पडताळणी करून याबाबत निर्णय देऊ असं बीएमसी कडून सांगण्यात आलंय. मात्र यावरती ठाकरे गटाने आक्षेप घेतला असून या संदर्भातील नोंद मुंबई महापालिका प्रशासनाने दाखवावी, असं ठाकरे गटाचे म्हणणं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha vijay live updates : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यात कोण कोण भाषण करणार?

Aastha Poonia: नौदलात लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला पायलट; कोण आहेत सब लेफ्टनंट आस्था पुनिया?

Maharashtra politics : मराठी भाषेच्या अस्मितेचा वाद टोकदार, शिंदेंनी दिला 'जय गुजरात'चा नारा

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना कर्ज नाही; अजित पवारांचं आश्वासन हवेत विरलं, कारण काय?

SCROLL FOR NEXT