Yashwant Jadhav  SaamTv
मुंबई/पुणे

Yashwant Jadhav: यशवंत जाधवांच्या डायरीतल्या 'M' ताई कोण?

यशवंत जाधवांच्या डायरीत आयकर विभागाला 'मातोश्री' व्यतिरिक्त अन्य दोन नावाचां उल्लेख असल्याचे समोर आले आहे.

सुरज सावंत

मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते, मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसतं आहे. आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात याआधीच यशवंत जाधवांची एक डायरी मिळाली होती. या डायरीमध्ये त्यांच्या अनेक व्यवहाराची पोलखोल झाली होती. या डायरीतील 'मातोश्री' हे प्रकरण चांगलच चर्चेत आलं होतं.

गुढीपाडव्याला ‘मातोश्री’ला 2 कोटींचे पेमेंट केले, मातोश्रीला 50 लाखांचे घड्याळ पाठवले, अशा नोंदी आयकर विभागाला त्यांच्या डायरीमध्ये सापडल्या त्यामुळे जाधवांची ती मातोश्री म्हणजे मुख्यमंत्र्यांचं घर असल्याचे आरोप केले होते. तर मातोश्री (Matoshri) म्हणजे माझी आई असं खुद्द जाधवांनी सांगितलं होतं हे प्रकरण ताज असतानाच आता आयकर विभागाला आणखी एका व्यवहाराचा मजकूर सापडला असून यामुळे पुन्हा यशवंत जाधव अडजणीत येण्याची शक्यता आहे.

आता यशवंत जाधवांच्या याच डायरीत आयकर विभागाला (Income Tax Department) 'मातोश्री' व्यतिरिक्त अन्य दोन नावाचां उल्लेख असल्याचे समोर आले असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. या डायरीत केबलमॅन याच्यापुढे एक कोटी 25 लाख दिल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे एम ताई या नावापुढे 50 लाख दिल्याचा उल्लेख आहे. या दोन लोकांविषयी माहिती आयकर विभाग गोळा करत आहे. या दोघांची अद्याप ओळख पटलेली नाही मात्र यामुळे जाधवांची अडचण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निलंगा उपजिल्हाअधिकारी कार्यालयासमोर महादेव कोळी आदिवासी समाज बांधवांचा ठिय्या

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT