दादा परत या ना... कोथरूडमध्ये झळकले चंद्रकांत पाटील बेपत्ता झाल्याचे पोस्टर्स (पाहा Video)

'दादा एक महिना झाला तुमचा शोध कुठेच लागत नाहीये. आम्ही तुम्हाला काहीही बोलणार नाही. तुम्ही जिथे कुठे असाल तिथून परत या. '
दादा परत या ना... कोथरूडमध्ये झळकले चंद्रकांत पाटील बेपत्ता झाल्याचे पोस्टर्स (पाहा Video)
Published On

प्राची कुलकर्णी -

पुणे : कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक (Kolhapur North By-Election) प्रचाराची रणधुमाळी ऐन जोमात आली आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पार्टी (BJP) अशी प्रमुख लढतअसणारी ही निवडणूक उभय पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. भाजपने या निवडणुक प्रचाराची सर्व जबाबदारी कोल्हापूरचे नेते तथा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांच्याकडे दिली आहे. दादा ही जबाबदारी पार देखील पाडताना दिसत आहेत. मात्र, इकडे त्यांच्या कोथरुड (Kothrud) मतदार संघातील नागरिकांनी दादा कुठे गेले, ते महिनाभरापासून गायब आहेत अशा आशयाचे पोस्टर्स लावल्याचा प्रकार समोर आला आहे.

मुळचे कोल्हापूरचे असलेले चंद्रकांत पाटील हे भाजपकडून (BJP) कोथरुड मतदार संघातून निवडणूक निवडून विजये झालेले आमदार आहेत कोल्हापूरच्या निवडणुकीत ते व्यस्त असल्यामुळे दादा कोथरुमध्ये नाहीतच ते कोल्हापूरातच ठाण मांडून बसले आहेत. त्यामुळे कोथरुडमधील परिसरात एखाद्या हरवलेल्या व्यक्तीच्या पोस्टर्सवरती मजकूर लिहितात त्या पद्धतीचा मजकूर लिहीत चंद्रकांत पोटलांचा फोटो लावण्यात आला आहे.

पोस्टर्सवरती दादा गायब झाल्याचा मजकूर -

पाहा व्हिडीओ -

दादा एक महिना झाला तुमचा शोध कुठेच लागत नाहीये. आम्ही तुम्हाला काहीही बोलणार नाही. तुम्ही जिथे कुठे असाल तिथून परत या. आम्ही तुमची वाट पाहतोय ! समस्त कोथरुडकर...

अशा आशयाचे पोस्टर्स कोथरुडमध्ये लावण्यात आले आहेत.

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलांनी कोथरुड मतदार संघातील कार्यकर्त्यांची फौज कोल्हापुरच्या मैदानत उतरवली असून त्यावरुन राष्ट्रवादीचे (Ncp) नेते मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी पाटील यांच्यावर निशाणा साधला होता ते म्हणाले, चंद्रकांत पाटील म्हणाले ३ लाख लोक प्रचाराला आणणार पण येथे तीन लाख मतदार आहेत. त्यामुळे तीन लाख लोक येथे येवून काय करणार? त्यापेक्षा युक्रेनाला पाठवा, निदाण त्या तेथेल बिचाऱ्यांना मदत तरी होईल, असा टोला मुश्रीफांनी लगावला होता तसच भाजपने बाहेरचे लोक आणून कोल्हापूरचा अभिमान दुखावला आहे असही ते म्हणाले होते.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com