Who becomes Leader Of Opposition In Maharashtra Legislative Council Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : विधानपरिषदेच्या विरोधीपक्षनेते पदावर शिवसेनेसह राष्ट्रवादीचाही डोळा

Leader Of Opposition In Maharashtra Legislative Council : नव्या सरकारला सामोरे जाण्यासाठी विधानपरिषदेचं विरोधीपक्षनेते पद हाच शिवसेना पक्षाचा एकमेव आवाज असेल असं सेनेचं म्हणणं आहे.

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: राज्याची सत्ता हातातून गेल्यानंतर आता महाविकास आघाडी विरोधी (MVA) पक्षाच्या बाकावर बसली आहे, तर शिंदे गटाच्या जोरावर भाजप सत्ताधारी बनला आहे. सत्तांतर झाल्यानंतर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची विधानसभेच्या विरोधीपक्षनेतेपदी निवड झाली. आता विधानपरिषदेच्या विरोधीपक्षनेत्याच्या पदासाठीही राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) इच्छुक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे, तर शिवसेनेलाही (Shivsena) विधानपरिषदेचं विरोधीपक्षनेते पद हवं आहे अशी चर्चा आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन मित्रपक्षांमध्ये विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेत्याच्या खुर्चीसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. (Maharashtra Legastive Assembly Leader Of Opposition)

हे देखील पाहा -

विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर शिवसेनेसह राष्ट्रवादीचाही डोळा आहे. विधानसभेतील विरोधीपक्षनेतेपदी राष्ट्रवादीचे अजित पवार यांची वर्णी लागल्याने शिवसेनेचा विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपदावर डोळा आहे. विधान परिषदेत एकूण सदस्यसंख्या ७८ असते, यामध्ये शिवसेनेचे १३ सदस्य आहेत. तर राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस दोघांकडेही १०-१० आमदार आहेत. त्यामुळे आमचे सदस्य जास्त असल्याने विरोधीपक्षनेते पद आम्हाला द्या अशी शिवसेनेची मागणी आहे.

राष्ट्रवादीकडून खडसेंचं नाव चर्चेत

नव्या सरकारला सामोरे जाण्यासाठी विधानपरिषदेचं विरोधीपक्षनेते पद हाच शिवसेना पक्षाचा एकमेव आवाज असेल असं सेनेचं म्हणणं आहे. सेनेच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितलं की, राष्ट्रवादी देखील या पदासाठी इच्छुक आहे. तर, भाजपशी लढण्यासाठी एकनाथ खडसेंसारखे अनुभवी नेते आहेत असं राष्ट्रवादीने म्हटलंय. दरम्यान, विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी शिवसेना विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी अध्यक्षांकडे नाव पाठवणार असल्याची माहिती आहे.

अजित पवार यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड

एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला, त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि राज्यात भाजप-शिंदे गटाचे सरकार स्थापन झालं. सत्ताधाऱ्यांमध्ये जसं मुख्यमंत्रीपद हे महत्वाचं असतं तसंच विरोधकांकडे विरोधी पक्षनेतेपद हे महत्वाचं असतं. विधानसभेच्या विरोधीपक्षनेतेपदी राष्ट्रवादीचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची निवड करण्यात आली आहे. आता विधानपरिषदेच्या विरोधीपक्षनेते पदासाछी शिवसेना इच्छूक आहे. (Maharashtra Legislative Council News)

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : मला मविआने खलनायक ठरवलं, मराठा समाज हिंदुत्वाच्या बाजूने - देवेंद्र फडणवीस

Maharashtra Election : अबब! राज्यात पैशांचा महापूर, आचारसंहितामध्ये आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त!

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

SCROLL FOR NEXT