Badlapur News Saam Tv
मुंबई/पुणे

Video : विरुद्ध दिशेने लोकल पकडताना आली एक्सप्रेस, जीव जाणारच तितक्यात...

प्रवाशांच्या निष्काळजीपणाचा व्हिडीओ आला समोर

अजय दुधाणे

Badlapur News : बदलापूरमध्ये रेल्वे प्रवासी वेळ वाचवण्यासाठी जीवघेणा शॉर्टकट वापरत असल्याचं समोर आलंय. हे प्रवासी विरुद्ध दिशेने ट्रॅकमध्ये उड्या मारून लोकल पकडत असून याच वेळी दुसऱ्या ट्रॅकवरून भरधाव वेगात एक एक्सप्रेस आली. हृदयाचा ठोका चुकवणाऱ्या या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय.

बदलापूर रेल्वे स्थानकात मुंबईच्या दिशेला जाण्यासाठी प्लॅटफॉर्म नंबर ३ वर लोकल येते. ही लोकल पकडण्यासाठी प्रवासी प्लॅटफॉर्म नंबर ३ ऐवजी प्लॅटफॉर्म नंबर २ वर उभे राहतात. आणि लोकल येताच विरुद्ध दिशेने ट्रॅकमध्ये उड्या मारून ही लोकल पकडतात. गुरुवारी सकाळी अशाच पद्धतीने काही प्रवासी लोकल पकडण्यासाठी ट्रॅकमध्ये उभे असताना अचानक प्लॅटफॉर्म नंबर २ वर भरधाव वेगात एक एक्सप्रेस आली.

त्यामुळे रुळात उभ्या असलेल्या प्रवाशांचीही चांगलीच भंबेरी उडाली. ही सगळी घटना अन्य एका प्रवाशाने मोबाईल कॅमेरात चित्रित केली असून हा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. या घटनेनंतर दोन रुळांच्या मध्ये रेल्वे प्रशासनाने जाळ्या बसवण्याची मागणी केली जाऊ लागली आहे. सोबतच प्रवाशांनीही काही मिनिटं वाचवण्यासाठी अशा पद्धतीने जीवघेणा शॉर्टकट वापरू नये, असं मत सोशल मीडियावर व्यक्त होतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care: १० रुपयांच्या व्हॅसलीनने होतात हे फायदे; महागड्या केमिकल क्रिमची कधीच लागणार नाही गरज

Wednesday Horoscope : महत्त्वाची वार्ता कानी पडणार; ५ राशींच्या लोकांसाठी बुधवार गेमचेंजर ठरणार

Wednesday Horoscope: पैशाला वाटा फुटतील, कटकटी संपणार नाहीत; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Prajkta Wedding: मालिकेतील येसूबाईंचा खऱ्या आयुष्यातील शुंभराजसोबत विवाह संपन्न,पाहा प्राजक्ताच्या लग्नाचे सुंदर PHOTO

बटण पसंतीच्या उमेदवाराचं दाबलं अन् लाइट पेटली भलतीकडे; संतापलेल्या मतदाराने ईव्हीएम फोडलं

SCROLL FOR NEXT