Maratha Reservation Latest News Saam TV
मुंबई/पुणे

Maratha Community Demand: मराठा समाजाच्या कोणकोणत्या मागण्या झाल्यात मान्य? संपूर्ण यादीच आली समोर...

Maratha Reservation Latest News: मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या नेमक्या काय होत्या? त्यातील कोण-कोणत्या मागण्या राज्य सरकारने पूर्ण केल्या? असा प्रश्न महाराष्ट्रातील मराठा समाजाला पडला आहे?

Satish Daud

Maratha Community Reservation Demand

मनोज जरांगेंसह लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईच्या वेशीवर येऊन धडकल्यानंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला. मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा समाजाच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. याचा अध्यादेश स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी (२७ जानेवारी) सकाळी ८ वाजता मनोज जरांगे यांच्या हाती देणार आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या नेमक्या काय होत्या? त्यातील कोण-कोणत्या मागण्या राज्य सरकारने पूर्ण केल्या? असा प्रश्न महाराष्ट्रातील मराठा समाजाला पडला आहे? मान्य झालेल्या सर्व मागण्यांची यादी साम टीव्हीच्या हाती लागली आहे.

मनोज जरांगेंच्या कोणकोणत्या मागण्या मान्य झाल्यात?

  • नोंदी मिळालेल्या सर्व लोकांच्या परिवारास कुणबी प्रमाणपत्र मिळाले पाहिजे. अशी मागणी जरांगे यांनी केली होती. ती मान्य करण्यात आली आहे.

  • राज्यभरात ५४ लाख नाही तर ५७ लाख नोंदी मिळाल्या आहेत. तसेच आतापर्यंत ३७ लाख लोकांना प्रमाणपत्र दिले गेले आहे. याचा डेटा आम्हाला द्या, अशी मागणी जरांगेंनी केली होती. ही मागणी मान्य करण्यात आली.

  • शिंदे समिती रद्द करायची नाही, ही जरांगे यांची मागणी मान्य झाली. सरकारने दोन महिने मुदत वाढवली. तसेच समितीची मुदत आणखी टप्प्याने वाढवणार असल्याचे मान्य केले.

  • सगे सोयऱ्यांना प्रमाणपत्र मिळाले पाहिजे. त्याशिवाय सोयऱ्यांचा फायदा होणार नाही. अशी जरांगेंची मागणी होती, ती सरकारने मान्य केली.

  • ज्या महाराष्ट्राच्या मराठ्यांकडे कुणबीची नोंद नाही, त्या बांधवांनी शपथपत्र करुन द्यायचे आहे. त्या शपथपत्राच्या आधारावर त्याला प्रमाणपत्र द्यायचे आहे. हे शपथपत्र १०० रुपयांना आहे. परंतु ते मोफत देण्याचे मान्य केले.

  • अंतरवाली सराटीसह मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घ्या, त्यासाठी गृहविभागाने पत्र द्यावे, अशी जरांगेंची मागणी होती. ती देखील मान्य करण्यात आली.

  • मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती करायची नाही. जर भरती केलीच, तर आमच्या जागा राखीव ठेवा, अशी मागणी जरांगेंनी यांनी केली. ती देखील मान्य करण्यात आली.

  • क्युरेटिव पिटीशनचा विषय सर्वोच्च न्यायालयात आहे. ते आरक्षण मिळेपर्यंत आणि मराठा समाजातील सर्वांना शंभर टक्के शिक्षण मोफत करण्यात यावे ही मागणी मान्य झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli : सांगलीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; सांगलीकरांची उडाली दैना

Pune Traffic : चाकण औद्योगिक क्षेत्रात वाहतुकीचा बोजवारा; पुणे-नाशिक महामार्गावर पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

वर्ध्यात सुपरफास्ट एक्स्प्रेसवर दगडफेक; गार्डसह ३ ते ४ प्रवासी जखमी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विदर्भाचे, तरीही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ का? आमदार बच्चू कडूंचा सवाल

Principal Bribery Case: मुख्याध्यापकाला अटक, लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडलं; नांदेडमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT