Sandeep Deshpande On Uddhav Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

Andheri Election: ...आम्हाला सहानभूती कधी मिळणार? मनसेच्या संदीप देशपांडेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

Mumbai Politics News: आम्ही गेली 25 वर्ष रस्त्यात नाही खड्यात चालतोय आम्हाला सहानभूती कधी मिळणार? 25 वर्ष मुंबईची तुंबई होतेय आम्हाला सहानभूती कधी मिळणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रुपाली बडवे, मुंबई

Sandeep Deshpande MNS: अंधेरी पोटनिवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. यात उद्धव ठाकरे गट विरुद्ध भाजप अशी थेट लढत होणार आहे. उद्धव ठाकरेंनी यासाठी कंबर कसली आहे. महाराष्ट्र नवनिर्णाण सेना (MNS) या निवडणुकीच्या रिंगणात नसली तरी मनसेचा भाजपला पाठिंबा मिळू शकतो अशी चर्चा आहे. अशात आता मनसेकडून उद्धव ठाकरेंवर आणि शिवसेनेच्या ठाकरे गटावर हल्लाबोल सुरु झालेला आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep deshpande) यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर थेट हल्ला करत बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. (MNS Latest News)

संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंना लिहीलेल्या पत्रात म्हटले की, तुमचे आमदार फुटले तुम्हाला सहानभूती, तुम्ही मुख्यमंत्री पद गमावलं तुम्हाला सहानभूती, तुमचं चिन्ह गेलं तुम्हाला सहानभूती. हे ठीक आहे पण आम्ही गेली 25 वर्ष रस्त्यात नाही खड्यात चालतोय आम्हाला सहानभूती कधी मिळणार? 25 वर्ष मुंबईची तुंबई होतेय आम्हाला सहानभूती कधी मिळणार?

कशाची सहानभूती पाहिजे तुम्हाला? करोना काळात लपून बसलात त्याची की, पन्नास लाखांचं घड्याळ मिळालं त्याची? महापौरांच्या मुलाला करोना काळात कंत्राट दिलं त्याची सहानभूती पाहिजे की, लोकांचे करोनामध्ये हाल होत असताना रात्री उशिरापर्यंत पबना परवानगी दिलीत त्याची सहानभूती पाहिजे?

करोनामध्ये जनतेला रुग्णालयात बेड मिळत नव्हता त्याची सहानभूती पाहिजे की सामान्य माणसाला हॉस्पिटल्सना बिलामध्ये लुटलं त्याची सहानभूती पाहिजे? रेल्वेमध्ये सामान्य माणसाला प्रवेश न देता आठ-आठ तास प्रवास करायला लावला त्याची सहानभूती पाहिजे? करोनामध्ये लोकांना उपाशी राहायला लागलं त्याची सहानभूती पाहिजे की शिवभोजनच्या नावाखाली भ्रष्टाचार झाला त्याची सहानभूती पाहिजे? पत्रा चाळीच्या घोटाळ्यात शेकडो मराठी माणसं बेघर केलीत त्याची सहानभूती पाहिजे? बार मालकाकडून शंभर कोटी वसूल केलेत त्याची सहानभूती पाहिजे की वाझेसारख्या अधिकाऱ्याला परत आणलंत त्याची सहानभूती पाहिजे?

मा .बाळासाहेबांच्या नावाखाली महापौर बंगला हडप केलात त्याची सहानभूती पाहिजे की त्याच्याच बाजूला असलेल्या महाराष्ट्र दालनाची दुरावस्था झाली आहे त्याची सहानभूती पाहिजे?अनधिकृत भोंग्यांविरुद्ध आंदोलन करण्याऱ्या महाराष्ट्र सैनिकांना तडीपार केलंत, जेलमध्ये टाकलेत त्याची सहानभूती हवीय की स्वतःच्याच भावाचे अमित आजारी असताना नगरसेवक चोरलेत त्याची सहानभूती हवीय?

वरळीत केम छो चे बोर्ड लावलेत त्याची सहानभूती हवीय की चतुर्वेदी ना खासदार केलंत त्याची सहानभूती हवीय? गेली पंचवीस वर्षे महानगर पालिका भ्रष्टाचाराने पोखरलीत त्याची सहानभूती हवीय? की सगळे अमराठी भ्रष्टाचारी कंत्राटदार महापालिकेत पोसलेत त्याची सहानभूती हवीय उद्धव साहेब एकदा मराठी माणसाला समजून सांगाच तुम्हाला कसली सहानभूती पाहिजे? अशी बोचरे सवाल त्यांनी उद्धव ठाकरेंना केली आहे.

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने '१६६ - अंधेरी पूर्व विधानसभा' मतदार संघाची पोटनिवडणूक (Election) जाहीर केली आहे. या पोटनिवडणुकीसाठी ३ नोव्हेंबर २०२२ रोजी मतदान होणार आहे. या निवडणूकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि भाजप यांच्यात थेट लढत होणार आहे. मात्र, आता मनसेनेही यात उडी घेतली आहे. अंधेरी पोट निवडणुकीत मनसे भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा मिळू शकतो. याबाबत चर्चा करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी ही भेट झाली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

SCROLL FOR NEXT