बोगसगिरी करणाऱ्या नगरसेवकांकडून पालिका कधी वसूल करणार; 40 लाख रुपये!
बोगसगिरी करणाऱ्या नगरसेवकांकडून पालिका कधी वसूल करणार; 40 लाख रुपये! Saamtv
मुंबई/पुणे

बोगसगिरी करणाऱ्या नगरसेवकांकडून पालिका कधी वसूल करणार; 40 लाख रुपये!

वैदेही काणेकरसह तुषार रुपनवर, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : नगरसेवक पद निर्रह ठरल्यानंतर 12 नगरसेवकांकडून वेतन व भत्ता पायी अदा केलेले 39 लाख 95 हजार 833 रुपये वसूल करण्यासाठी पत्रव्यवहार केल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस महापालिका चिटणीस खात्याने दिली आहे. यात भाजपाचे 3, शिवसेनेचे 3, काँग्रेसचे 3, राष्ट्रवादी काँग्रेसचे 1 आणि अपक्ष 2 नगरसेवक आहेत.When will the corporation recover Rs 40 lakh from the corporators?

हे देखील पहा-

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महापालिका चिटणीस खात्याकडे माहिती मागितली होती की ज्या नगरसेवकांचे पद निर्रह झाले त्यांसकडून वेतन व भत्ता पायी अदा केलेली रक्कम वसूल करण्यात आली आहे. माहिती अधिकार अंतर्गत दिलेली माहितीत चिटणीस खात्याने 24 नगरसेवकांची यादी दिली ज्यांचे पद विविध कारणांसाठी निर्रह झाले आहेत. यात 12 नगरसेवकांनी 39 लाख 95 हजार 833 रुपये अदा केले नाहीत. तर 9 नगरसेवकांनी तत्काळ रक्कम अदा केली आहे. 3 असे नगरसेवक आहेत जे ज्यांस निर्रह ठरल्यानंतर कोणतीही रक्कम अदा करण्यात आली नाही.

थकबाकी न देण्यामध्ये भाजपा, शिवसेना आणि काँग्रेसचे प्रत्येक 3 नगरसेवक आघाडीवर आहेत यात भाजपाचे मुरजी पटेल 5.64 लाख रुपये, केशरबेन पटेल 5.64 लाख रुपये आणि भावना जोबनपुत्रा 3.49 लाख रुपये अदा करत नाहीत. काँग्रेसचे राजपती यादव 5.64 लाख रुपये, किणी मॉरेश 4.84 लाख रुपये आणि भारती धोंगडे 1.81 लाख रुपये अदा करण्यास तयार नाही. शिवसेनेचे सगुण नाईक 3.55 लाख रुपये, अनुषा कोडम 37 हजार आणि सुनील चव्हाण 93 हजार रुपये अदा करत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाजीया सोफी 7.21 लाख रुपये अदा करत नाहीत. अपक्ष असलेलं चंगेझ मुलतानी 79 हजार रुपये आणि अंजुम असलम 45 हजार रुपये अदा करत नाहीत.

अनिल गलगली यांनी पालिका आयुक्तांना पत्र पाठवून मागणी केली आहे की जे नगरसेवक रक्कम अदा करत नाहीत त्यांच्या मालमत्तेवर टाच आणण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून पैसे वसूल होतील.

Edited By-Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Tourist: उन्हाळ्याची सुट्टी घालवा रत्नागिरीत; 'ही' ७ ठिकाणे आहेत खास

Maval Lok Sabha: मावळचा गड राखण्यासाठी महायुतीचा प्लॅन काय? जाणून घ्या

RCB Vs GT : आरसीबीचा घरच्या मैदानावर मोठा विजय; गुजरातला नमवत ७ व्या क्रमांकावर झेप

KPK Jeyakumar : काँग्रेस नेत्याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ; दोन दिवसांपासून होते बेपत्ता

Riteish Deshmukh: मराठमोळ्या रितेश देशमुखची 'लय भारी...' फॅशन

SCROLL FOR NEXT