Sanjay Raut RokhThok In Saamana Today
Sanjay Raut RokhThok In Saamana Today Saam TV
मुंबई/पुणे

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात भाजप-आरएसएसचं योगदान काय? सामनातून जहरी टीका; तर भारत जोडो यात्रेचं कौतुक

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

Sanjay Raut RokhThok: भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात भारतीय जनता पक्षाच आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचं योगदान काय आहे असा रोखठोक सवाल शिवसेनेचे मुखपत्र असलेल्य सामना या दैनिकाच्या संपादकीय अग्रलेखातून सत्ताधाऱ्यांना विचारण्यात आला आहे. तर खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रेचं सामनातून कौतुक करण्यात आलं आहे. (Saamana Today)

भाजपने स्वातंत्र्य लढ्यातील योगदान दाखवावं

सामना अग्रलेखातून (Saamana Editorial) भाजपला आवाहन करण्यात आलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो' यात्रेमध्ये मल्लिकार्जुन खरगे यांनी जळजळीत वास्तव मांडले. "देशाच्या स्वातंत्र्यासाठी गांधी कुटुंबाने आपल्या प्राणांचे बलिदान दिले. मात्र स्वातंत्र्यासाठी तुमचा कुत्राही मेला नाही." खरगे यांच्या विधानावरून भारतीय जनता पक्ष संतापला असल्याचं म्हणज खरगे यांनी जो मुद्दा उपस्थित केला त्याचा प्रतिवाद भारतीय जनता पक्षाने करायला हवा, आणि भारतीय जनता पक्षाने स्वातंत्र्य लढय़ातील त्यांचे योगदान दाखवायला काहीच हरकत नाही! असं आवाहन सामनातून भाजपला करण्यात आलं आहे.

अमृता फडणवीसांवंर टीका

अमृता फडणवीस यांच्या वक्तव्याचा समाचार सामनातून घेण्यात आला आहे. "आपल्या देशाचे दोन राष्ट्रपिता आहेत. महात्मा गांधी हे जुन्या भारताचे, तर नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत!" असं अमृता फडणवीस म्हणाल्या होत्या. पण, अमृता फडणवीस यांनी मांडलेल्या विचारांशी त्यांचा पक्ष सहमत आहे काय? असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे.

कंगणा रणौतचाही समाचार

अभिनेत्री कंगणा रणौत म्हणाली होती की, "देशाला खरे स्वातंत्र्य 2014 नंतर म्हणजे पंतप्रधानपदी श्री. मोदी आल्यावर मिळाले. त्यामुळे 2014 नंतर एक नवा भारत निर्माण झाला व त्या भारताचे राष्ट्रपिता श्री नरेंद्र मोदी आहेत!" यावरुन ही सामनातून समाचार घेण्यात आला आहे. भविष्यात 2024 नंतर सरकार बदलले तर नव्या भारताच्या नव्या राष्ट्रपित्याच्या पदवीचे काय करायचे? असा सवाल उपस्थित करत स्वातंत्र लढयाच्या इतिहासात भाजप-संघ यांचे नामोनिशाण कुढे आहे काय? निदान स्वातंत्र्य लढ्यातील तुमचा कुत्रा तरी दाखवा अशी बोचरी टीका सामनातून करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

तर हा मोदींचाच अपमान ठरेल...

भारतीय जनता पक्षाकडे स्वतःची प्रेरणादायी प्रतीके नाहीत. त्यामुळे सरदार पटेल, नेताजी बोस या मूळच्या कॉंग्रेस लढवय्यांची चोरी करावी लागली. डॉ. आंबेडकरांच्या बाबतीत त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. काँग्रेस पक्षाने लोकमान्य टिळक, सरदार पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह असंख्य स्वातंत्र्यसैनिकांना कशी वागणूक दिली हे देशातील जनतेस माहीत आहे. हजारो स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानामुळे निर्माण झालेला स्वतंत्र भारत भाजपला मान्य नाही काय? मग त्यांचा भारत कोणता? या नव्या भारतात आजही भूक, गरिबी, बेरोजगारी, दहशतवाद यांची भुते नाचत आहेत. या नव्या भारताचे राष्ट्रपिता म्हणून मोदींना विराजमान करणे हा मोदींचाच (PM Modi) अपमान ठरेल अशी जळजळीत टीका सामनातून करण्यात आली आहे.

भाजपला सत्य बोलणाऱ्यांचे भय वाटते

स्वतःचा इतिहास नसला की दुसऱ्यांचा इतिहास नष्ट करण्याची धडपड सुरू होते. हा एक प्रकारचा न्यूनगंडच असतो. ज्या काळात, ज्या लढय़ात आपण कधीच नव्हतो तो काळ पुसण्याचा प्रयत्न सुरू आहे. स्वातंत्र्य लढ्याची प्रतीके व प्रतिमा उद्ध्वस्त होताना दिसत आहे. नवे राष्ट्रपिता, नवे सरदार, नवे पंडित, नवे मौलाना, नवे नेताजी, नवे हिंदुहृदयसम्राट, नवी शिवसेना, नवी काँग्रेस निर्माण करण्याचा ध्यास घेतला आहे. हे सर्व का व कशासाठी? असा सवाल सामनातून विचारण्यात आला.

तसेच राहुल गांधींची  (Rahul Gandhi) 'भारत जोडो' यात्रा जोरात निघाली. ती दिल्लीच्या सीमेवर पोहोचली तेव्हा कोरोनाचे भय निर्माण करून ती रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशाच्या राजधानीत राहुल गांधींबरोबर लाखो लोक राष्ट्रीय ऐक्यासाठी चालत आहेत. हे चित्र जगात पोहोचेल याचे भय भाजपास वाटते. स्वातंत्र्यासाठी एकही लाठी न खाणाऱ्यांच्या हाती आज देशाची सूत्रे आहेत. त्यांना लढणाऱ्यांचे व सत्य बोलणाऱ्यांचे भय वाटते. हे किती काळ चालायचे? असा खरमरीत सवाल सामना अग्रलेखातून सत्ताधाऱ्यांनी विचारण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Porsche New Car: व्हॉईस कमांड, 6 एअरबॅग्ज आणि 270kmpl स्पीड; पोर्शची डॅशिंग कार भारतात लॉन्च

Mumbai News : जेव्हीएलआर मार्गावरील वाहतुकीत ३१ मे पर्यंत बदल, नेमकं काय आहे कारण?

LSG vs KKR : कोलकाताकडून लखनऊचा दारूण पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

Canada Import from India : कॅनडा भारताकडून काय मागवतो

Uddhav Thackeray: मोदींचं PM पदासाठी नाव सुचवलं हे माझं पाप, उद्धव ठाकरे यांनी भरसभेत व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT