असं काय घडलं? की, लालबागकरांना ८८ वर्षांपूर्वीच्या इतिहासाची आठवण झाली lalbaugcharaja.com
मुंबई/पुणे

असं काय घडलं? की, लालबागकरांना ८८ वर्षांपूर्वीच्या इतिहासाची आठवण झाली

८८ वर्षांपूर्वी तेव्हाच्या ब्रिटीश सरकारने लालबाग मार्केट बंद करण्याचा घाट घातला होता. आज मुंबई पोलिसांनी सुरक्षेच्या नावाखाली लालबाग मार्केटला पोलिस छावणीचं स्वरूप दिलं आणि....

वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई

लालबाग मार्केटमध्ये इतिहासाची पुनारावृत्ती झाली आहे. ८८ वर्षांपूर्वी तेव्हाच्या ब्रिटीश सरकारने लालबाग मार्केट बंद करण्याचा घाट घातला होता. त्यावेळी स्थानिक कोळी बांधव, व्यापारी आणि दुकानदार यांनी त्यांच्या मागण्या मान्य झाल्यानंतरच मार्केटमध्ये लालबागच्या राजाची स्थापना करू असा नवस केला होता.

हे देखील पहा -

स्थानिक रहिवाश्यांचा नवस पुर्ण होताच लालबाग मार्केटमध्ये लालबागच्या राजाची स्थापना करण्यात आली. आज ८८ वर्षांनंतर मुंबई पोलिसांनी अती सुरक्षेच्या नावाखाली लालबाग मार्केटला पोलिस छावणीचं स्वरूप दिलं आणि सर्व दुकानं ऐन गणेशोत्सवात बंद केली. त्यामुळे स्थानिक गणेशभक्तं दुकानदार संतप्तं झाले. स्थानिक दुकानदारांच्या पाठीशी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ठामपणे उभे राहीले आणि मुंबई पोलिसांकडे दुकानं उघडी करण्याची मागणी लावून धरली. त्यासाठी लालबागच्या राजाची प्राणप्रतिष्ठापना पूजाही थांबवली.

अखेर वरिष्ठ पेलिसांनी मध्यस्थी करत लालबाग मार्केटमधील दुकानं उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी मागण्या मान्य झाल्यामुळे स्थानिक दुकानदार आनंदीत झाले. मात्र सर्वांना ८८ वर्षांपूर्वीच्या इतिहासाची आठवण झाली.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections Result Live Update : सोलापूरमध्ये भाजपचा धुमधडाका, एकाच प्रभागात भाजपचे चारही उमेदवार विजयी

Mental Health: सकाळी उठल्यावर 'या' 5 गोष्टी चुकूनही करू नका, दिवसभर आळस अन् ताण येईल

Love Story: मुलगा हमाली करतो म्हणून नकार,आज आहे सुखी संसार; अशी आहे बिग बॉस फेम रोशन भजनकरची फिल्मी लव्हस्टोरी

Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादववर आरोप करणं पडलं महागात; 'त्या' अभिनेत्रीवर १०० कोटींचा मानहानीचा दावा

अजित पवारांना मोठा धक्का, पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे 74 उमेदवार आघाडीवर |VIDEO

SCROLL FOR NEXT