Western Railway Yandex
मुंबई/पुणे

Western Railway: पश्चिम रेल्वेवरील वाहतूक सेवा विस्कळीत, तांत्रिक बिघाडामुळे लोकल उशिराने

Mumbai Local Train Update: पश्चिम रेल्वेवर दादर येथे तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे गाड्या १५ ते २० मिनिट उशीराने सुरू आहे.

Rohini Gudaghe

गणेश कवडे साम टिव्ही, मुंबई

लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. पश्चिम रेल्वेवरील (Western Railway) सेवा विस्कळीत झाली आहे. पश्चिम रेल्वे तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहे. लोकल उशिराने सध्या धावत आहे. विशेष करून जलद धावणाऱ्या गाड्यांवर याचा जास्त परिणाम झाल्याचं दिसत आहे. प्रवाशी ट्रॅकवरून चालत असल्याचं समोर आलं आहे.

पश्चिम रेल्वेवर दादर येथे तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे गाड्या १५ ते २० मिनिट उशीराने सुरू आहे. सकाळच्या वेळीच (Mumbai Local Train Update) तांत्रिक बिघाड झाल्यामुळे प्रवाशांचे मोठा प्रमाणावर हाल होत आहे. यामुळे चर्चगेटकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. प्रवाशी रेल्वे ट्रॅकवरून चालताना दिसत आहेत. तांत्रिक बिघाडामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे.

सकाळ वेळी उपनगरातून लाखो चाकरमानी मुंबईच्या दिशेने लोकलने प्रवास करतात. विशेष करून सकाळच्या वेळी या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. मात्र, सकाळच्या वेळीच यंत्रणेत तांत्रिक बिघाड (Western Railway Trains Running Late) झाल्यामुळे प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी उशीर होत आहे. गाड्या रेल्वे रुळावर रखडल्या असल्याचं चित्रही आज दिसत आहे. या बिघाडामुळे चर्चगेटकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाल्याचं दिसत आहे.

पश्चिम रेल्वेवर एसी लोकल सेवेची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. वातानुकूलित गाड्यांमधुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण वाढत आहे. एसी लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असल्याचं (Mumbai local) पाहायला मिळतंय. 6 मे 2024 रोजी पश्चिम रेल्वेने एसी लोकलला 3737 तिकिटे वितरित केली होती. हा टप्पा प्रवाशांमध्ये एसी प्रवासाच्या पर्यायांची वाढती मागणी असल्याचं दर्शवतो. पश्चिम रेल्वेने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, 1 मे ते 6 मे या कालावधीत लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या एकूण प्रवाशांची संख्या 9 लाख 16 हजार 093 होती. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Mushroom Masala: अवघ्या काही मिनिटात तयार करा झणझणीत आणि चवदार मशरूम मसाला

ड्रम निळ्या रंगाचाच का असतो?

Lip Care: हायड्रेशनच्या कमीमुळे ओठ काळे पडले आहे का? मग करा 'हे' घरगुती उपाय

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT