WESTERN RAILWAY TO RAISE VASAI-VIRAR TRACKS BY 400MM TO PREVENT MONSOON WATERLOGGING Saam tv
मुंबई/पुणे

Local Train Update : नालासोपारा-वसईत ट्रॅकवर पाणी साचण्याची कटकट संपणार, रेल्वेने घेतला 'हा' मोठा निर्णय

Western Railway News : मुंबई लोकल सेवेला वारंवार अडथळा आणणाऱ्या वसई-विरार परिसरातील पाणी साचण्याच्या समस्येवर पश्चिम रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वे रुळांची पातळी ४०० मिमीने वाढवण्याचा निर्णय रेल्वेने हाती घेतला आहे.

Alisha Khedekar

  • पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय

  • वसई, विरार, नालासोपारा दरम्यान रुळांची उंची वाढवली जाणार

  • रुळांची उंची ४०० मिमीने वाढवण्याचा निर्णय

राज्यात यंदा उशिराने दाखल झालेल्या मान्सूनने जुलै महिन्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये चांगलाच जोर पकडला. गेल्या ८ दिवसात मुंबईसह अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने बॅटिंग केली. या पावसामुळे मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल सेवेला मोठा फटका बसला. पश्चिम रेल्वे पूर्णपणे पाण्याखाली गेलेली पाहायला मिळाली. वसई, विरार, नालासोपारा या स्टेशनदरम्यान रुळावर पाणी साचून रेल्वेसेवा जवळपास १ तास उशिराने धावत होती. यानंतर अतिवृष्टीच्या काळातही रेल्वे सेवा सुरळीत राहावी यासाठी रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, वसई परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाले आहे. यामुळे अनेक गटारांची रुंदी कमी होऊन असून पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे . अतिवृष्टीच्या काळात पाण्याचा निचरा न झाल्याने रेल्वे रुळांवर पाणी साचते आणि रेल्वे वाहतूक ठप्प होण्याची वेळ येते.

या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून पश्चिम रेल्वेने रुळांची उंची सुमारे ४०० मिमीने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच भविष्यात उभारण्यात येणाऱ्या नवीन रेल्वे मार्गांची पातळीही अधिक उंच ठेवली जाणार आहे. यासोबतच संपूर्ण परिसरातील पाणी सांडपाणी वाहून जाण्यासाठी व्यवस्था मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे.

अतिरिक्त ड्रेनेज लाईन टाकणे, नाल्यांची क्षमता वाढवणे आणि पावसाचे पाणी वेगाने बाहेर जाण्यासाठी आवश्यक अभियांत्रिकी कामे हाती घेतली जाणार आहेत. या प्रकल्पामुळे भविष्यात मुसळधार पाऊस झाला तरी रेल्वे रुळांवर पाणी साचण्याचे प्रमाण कमी होईल आणि लाखो प्रवाशांना वारंवार होणाऱ्या गैरसोयीपासून दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nepal : ६ हून अधिक शहरांमध्ये कर्फ्यू; नेपाळमध्ये हिंसाचार उफाळला, दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना

LPG सिलेंडर ते रेल्वे तिकीट; १ ऑगस्टपासून देशभरात होतील ५ मोठे बदल

Maharashtra News Live Update: संततधार पावसाचा फटका; कुनघाडा रयतवारी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत शिरले पाणी

वंदे मातरमचा अपमान केला तर आता थेट जेल; संसदेत विधेयक मंजूर; कायद्यात तरतुदी काय आहेत? जाणून घ्या...

समृद्धी महामार्गावर प्रवाशांची लुटमार; बुलढाण्यातून पाच जणांच्या टोळीला अटक

SCROLL FOR NEXT