Western Railway Jumbo Megablock Saam Tv
मुंबई/पुणे

Western Railway Jumbo Megablock: मोठी बातमी! पश्चिम रेल्वेचा २ जूनचा जम्बोब्लॉक रद्द

Western Railway Jumbo Megablock Cancels: रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. पश्चिम रेल्वेने उद्याचा जम्बोब्लॉक रद्द केलेला आहे.

Rohini Gudaghe

पश्चिम रेल्वेचा २ जूनचा जम्बोब्लॉक रद्द करण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. शुक्रवारपासून मध्य रेल्वेचा महामेगाब्लॉक सुरू झाला आहे. या कालावधीत ९०० च्या वर लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

या दरम्यान पश्चिम रेल्वेने देखील चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान जम्बो ब्लॉक जाहीर केला होता. त्यामुळे रेल्वे प्रवाशांची सर्वच मार्गांवर कोंडी होणार (Western Railway Jumbo Megablock) असल्याचं चित्र होतं. मात्र, प्रवाशांची अडचण लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने २ जूनचा जम्बो ब्लॉक रद्द केलेला आहे.

मध्य रेल्वे मार्गावर शुक्रवारपासुन रविवारपर्यंत ६३ तासांचा जम्बोब्लॉक सुरू आहे. त्यामुळे या दरम्यान तब्बल ९३० लोकल ट्रेनच्या फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या (Central Railway Megablock) आहेत. त्यामुळे उपनगरातून कामाधंद्यानिमित्त मुंबईत येणाऱ्या लाखो प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. मध्य रेल्वेमार्फत तांत्रिक कामामुळे ३० मे ते २ जून २०२४ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत जम्बो ब्लॉक घेतला आहे. मध्य रेल्वेच्या जम्बोब्लॉकमुळे आज मुंबईकर चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. या ब्लॉकमुळे रेल्वे स्थानकांवर शुकशुकाट दिसून येत आहे.

मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकचा आज दुसरा दिवस (Mumbai News) आहे. तब्बल ५३४ लोकलच्या फेऱ्या या ब्लॉकमुळे रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबईकरांसमोर प्रवासाचं आव्हान आहे. सीएमएसटी येथे फलाट क्रमांक १० आणि ११ च्या विस्तारीकरणाचे काम सुरु आहे. रेल्वे प्रवाशांनी रेल्वे ब्लॉकमुळे महत्वाचे काम असेल तरच बाहेर पडावं, असं आवाहन संबंधित प्रशासनाकडून करण्यात (Mumbai Local News) आलं आहे. परंतु मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक लक्षात घेऊत आता पश्चिम रेल्वेने जम्बोब्लॉक रद्द केलेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gen Z मधील ट्रेंड; रिलेशनशिपमधील Soft Launch आणि Hard Launch म्हणजे काय?

Nikki Tamboli Photos: उफ्फ तेरी अदा... निक्कीचे फोटो पाहून नेटकरी फिदा

Maharashtra Live News Update: बीडमध्ये होणार छगन भुजबळांची महाएल्गार सभा

ST Employees Bonus: ST कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा होणार गोड! सरकारकडून इतका बोनस जाहीर|VIDEO

Lasun Sev Recipe : घरीच बनवा झणझणीत-कुरकुरीत लसूण शेव, दिवाळीच्या फराळाची वाढेल रंगत

SCROLL FOR NEXT