Mumbai Local Latest Marathi News
Mumbai Local Latest Marathi News Saam Tv
मुंबई/पुणे

पश्चिम रेल्वेची लोकल वाहतूक विस्कळीत; ओव्हरहेड वायर तुटल्याने खोळंबा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - पश्चिम रेल्वेची बोरीवली ते दहिसर दरम्यान लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांना (Mumbai) मनस्थाप सहन करावा लागत आहे. ओव्हरहेड वायर तुटल्याने ऐन सकाळीच कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. दहिसर ते बोरीवली या रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटली आहे. (Mumbai Local Latest Marathi News)

हे देखील पाहा -

त्यामुळे जलद मार्गावरील लोकल बंद आहेत. तसेच सर्वच रेल्वे गाड्या १० ते १५ मिनिटे उशिरा धावणार आहेत. रेल्वे प्रशासनाकडून या ओव्हरहेड वायर दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच लोकल सेवा सुरळीत होईल अशी माहिती देण्यात आली आहे.

पहाटे पाच वाजता दहिसर ते बोरीवली रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याची माहिती समोर आली आहे. तेव्हापासून कोणतीही लोकल जलद मार्गावरुन सोडण्यात आलेली नाही. त्यामुळे स्लो मार्गावरील वाहतूकीवर याचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. अनेक स्थानकांत प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. लोकल सेवा सुरळीत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News : जेव्हीएलआर मार्गावरील वाहतुकीत ३१ मे पर्यंत बदल, नेमकं काय आहे कारण?

LSG vs KKR : कोलकाताकडून लखनऊचा दारूण पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

Canada Import from India : कॅनडा भारताकडून काय मागवतो

Uddhav Thackeray: मोदींचं PM पदासाठी नाव सुचवलं हे माझं पाप, उद्धव ठाकरे यांनी भरसभेत व्यक्त केली खंत

Mumbai Local : तीन प्रवाशांच्या मृत्यूनंतर मध्य रेल्वेला आली जाग; लोकलच्या गर्दी नियंत्रणासाठी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT