D S Kulkarni  Saam Tv
मुंबई/पुणे

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक DSK यांना जामीन, तुरुंगातून सुटका होणार का?

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता, कारण...

साम टिव्ही ब्युरो

पुणे : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी (D. S Kulkarni) यांना मोफा प्रकरणात पुणे न्यायालयाने जामीन मंजूर केला. डीसके यांच्यावर मार्च २०१९ मध्ये अटकेची कारवाई करण्यात आली होती. परंतु, आता त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर (Bail Granted) केल्याने त्यांची तुरुंगातून सुटका होणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ग्राहकांकडून अनामत रक्कम घेवून त्यांना फ्लॅटचा ताबा दिला नाही, अशा आरोपाखाली डीएसके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

डीएसके आणि त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांनी ग्राहकांकडून आगाऊ रक्कम घेतली आणि त्यांना फ्लॅटचा ताबा देण्यात आला नाही, असा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. दरम्यान, ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुख्य गुन्ह्यातील आरोपी डीएसके आणि इतर आरोपी १७ फेब्रुवारी २०१८ पासून तुरुंगात आहेत. डीसके यांना जामीन मिळावा यासाठी त्यांचे वकील आशुतोष श्रीवास्तव आणि वकील रितेश येवलेकर यांनी अर्ज केला होता.परंतु हा अर्ज अजूनही सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. त्यावर २६ जुलै रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Schezwan Fried Rice: हॉटेलसारखा शेजवान फ्राइड राईस घरच्या घरी कसा बनवायचा?

बॉक्सिंग रिंगमधून उदय ते मोस्ट वॉन्टेड गुंड; 32 गंभीर गुन्हे अन्... बाबा सिद्दीकी प्रकरणातील मुख्य आरोपी अनमोल बिश्नोई नेमका कोण? VIDEO

नाराजीनाट्यानंतर एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; शहाजी बापू पाटीलही भावुक, म्हणाले, एकटे पाडले?'

Amla Murabba Recipe : गुलाबी थंडीत 'असा' बनवा आवळ्याचा मुरंबा, आजीच्या हाताची अस्सल चव

Maharashtra Live News Update: कुर्लामधील कोहिनूर सीटी बिल्डिंगच्या ५ व्या मजल्याला आग

SCROLL FOR NEXT