मुंबई/पुणे

Weather Update : परतीचा पाऊस पुन्हा आलाच! मुंबईसह उपनगरात जोरदार सरी, पुढील ३-४ तास महत्वाचे, IMD चा अलर्ट काय?

Bharat Jadhav

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्यामुंबई केंद्राने आज सोमवारी संध्याकाळ किंवा रात्री मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला. या अंदाजानुसार मुंबईतील गिरगाव, अंधेरी, विरार भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. याचबरोबर मुंबईच्या उपनगरातदेखील परतीच्या पावसाने धुमाकूळ घातलाय.

IMD च्या अंदाजानुसार मुंबईतील काही ठिकाणी गडगडाटी वादळे येण्याची शक्यता वर्तवली होती. ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली होती. हवामान विभागाचा हा अंदाज खरा ठरला असून त्यानुसार बोरिवली, विरार भागात वादळी वारे वाहत आहेत. भिवंडीत परतीच्या पावसाचा धुमाकूळ घातला असून अनेक घरांचे पत्रे उडाले आहेत.

भिवंडीत परतीच्या पावसाने जोरदार थैमान घातले आहे. विजेच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने तालुक्यातील ग्रामीण भागांत हाहाकार माजवला आहे. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. अंबरनाथमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस पडला. जवळपास अर्धा ते पाऊण तास ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळला.

भिवंडी तालुक्यातील करंजोटी गावात या पावसामुळे अनेक घरांचे पत्रे उडाले असून, ग्रामीण भागातील विजेच्या तारा आणि खांबावर पावसाचा मोठा परिणाम झाला आहे. विजेच्या कडकडाटासह आलेल्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी बत्ती गुल झाली आहे. वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

दरम्यान हवामान खात्याने बुधवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केलाय. पालघर, ठाणे, धुळे आणि नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाच्या शक्यतेनुसार सोमवारी IMD ने 'यलो अलर्ट' जारी केला आहे. नैऋत्य मोसमी पावसाने माघार घेतल्याने रविवारी संध्याकाळी मुंबईतील अनेक भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. सध्या मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू आहे.

ओरिसातील गोपाळपूर, छत्तीसगडमधील रायपूर, महाराष्ट्रातील नंदुरबार, मध्य प्रदेशातील खरगोन आणि गुजरातमधील नवसारी येथून परतीचा प्रवास सुरू आहे. येत्या दोन दिवसांत संपूर्ण देशातून मान्सून माघार घेऊ शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut Press Conference : जागा वाटपावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; सांगितले मविआच्या जागांचे सूत्र

Gold Silver Price: सोनं ७८००० वर पोहचलं; दिवाळीआधीच सोने-चांदीला झळाळी

Dustbin Scam : नवी मुंबई मनपामध्ये डस्टबिन घोटाळा; काम न करता जुने फोटो दाखवून लाखोंचा भ्रष्टाचार

Karmayogi Abasaheb: सोलापुरात ५४ वर्षे आमदार, लोकांसाठी झटला, सर्वसामान्य नेत्याची कथा मोठ्या पडद्यावर! चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Priyanka Chopra Daily Skin Care: वयाच्या ४२ व्या वर्षीही कशी राहिल त्वचा चमकदार? जाणून घ्या प्रियांका चोप्राच्या ब्युटीचं सिक्रेट

SCROLL FOR NEXT