Rain News in Maharashtra Today Saam TV
मुंबई/पुणे

Weather Forecast : मुंबईसह राज्यातील 'या' भागात आजपासून अतिमुसळधार पावसाचा इशारा; वाचा कुठे-कुठे कोसळणार पाऊस

Rain News in Maharashtra Today : राज्याच्या किनारपट्टीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे आजपासून राज्यात पावसाचा जोर (Heavy Rain) वाढणार, असं भारतीय हवामान खात्याने सांगितलं आहे.

Satish Daud

संपूर्ण जून महिन्यात लपंडाव खेळणाऱ्या पावसाने जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी राज्यात जोरदार पुनरागमन केले. मंगळवारी मुंबई उपनगरासह राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाच्या सरी बरसल्या. पावसामुळे खरीप हंगामाला वेग आला असून शेतकरी सुखावला आहे. पुढील ४८ तासांतही राज्यात मुसळधार पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

आठवडाभरापूर्वी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाला होतं. मात्र, आता राज्याच्या किनारपट्टीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे आजपासून राज्यात पावसाचा जोर (Heavy Rain) वाढणार, असं भारतीय हवामान खात्याने सांगितलं आहे.

मुंबईसह उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा अलर्ट (IMD Rain Alert) जारी करण्यात आला आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस (Rain News Maharashtra) पडण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव तसेच परभणी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार आहे. दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबारसह जळगाव जिल्ह्यात तुफान पावसाची शक्यता आहे. नागरिकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावे, असं आवाहन करण्यात आलंय.

दरम्यान, जुलै महिन्यात राज्यासह संपूर्ण देशभरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज आहे. आयएमडीच्या माहितीनुसार, प्रशांत महासागरातील एल-निनो तटस्थ अवस्थेत गेला आहे. त्यामुळे ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांत ला-निनाची स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे जुलै महिन्यात देशभरात सरासरीच्या १०६ टक्के पावसाचा अंदाज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Earth Threat : 116 दिवसात जग नष्ट होणार? शास्त्रज्ञाच्या दाव्याने जगावर मोठं संकट, वाचा स्पेशल रिपोर्ट

Viksit Bharat Rozgar Yojana : साडेतीन कोटी तरूणांना 15 हजार मिळणार, स्वातंत्र्यदिनी मोदींचं गिफ्ट; कोण ठरणार पात्र?

Maharashtra Live Update: गिरगावचा महाराजा मुखदर्शन, गिरगावच्या महाराजा साकारतोय जगन्नाथ भव्यरूप

Accident : स्वातंत्र्यदिनासाठी निघाला, बाईक स्लीप झाली अन् कंटेनरच्या खाली आला, विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत

Sesame Seeds: पांढरे तीळ खाण्याचे 'हे' आश्चर्यकारक फायदे महितीये का?

SCROLL FOR NEXT